देशातील राज्यसभेच्या १८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुका करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु आता या निवडणुका १९ जून रोजी पार पडणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीही करण्यात येणार आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २६ मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.

राज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणुका पार पडणार होत्या. ५५ पैकी ३७ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहोत. परंतु १८ जागांवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती. उर्वरित जागा या जागा आंध्र प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, मणिपूर, राज्यस्थान, गुजरात आणि मेघालय या राज्यांच्या कोट्यातील आहेत.

राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ मे रोजी निवडणुका घेण्यात येणार आहे. तसंच त्याच दिवशी या निवडणुकांचे निकालही घोषित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली. आंध्र प्रदेशच्या ४, झारखंडच्या २, मध्यप्रदेशातील ३, मणीपूरच्या एक, मेघालयच्या एक, राजस्थानच्या ३ आणि गुजरातच्या चार जागांसाठी ही निवडणुक प्रक्रिया पार पडणार आहे. १९ जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात होणार आहे.