News Flash

सरन्यायाधीश एनव्ही रामणा तिरुपती मंदिरात नतमस्तक

टीटीडी ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी, डॉ. केएस रेड्डी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले

मंदिराच्या प्रवेशद्वारात त्यांचे मंत्रोच्चाराच्या घोषात स्वागत केले गेले

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रामणा यांनी तिरुपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सरन्यायाधीश रामणा हे तिरुमला येथील पद्मावती विश्रामगृहात पोहचले तेव्हा, टीटीडी ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी, डॉ. केएस रेड्डी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

सरन्यायाधीश रामणा यांनी पत्नी एन शिवमाला यांच्यासह काल (गुरूवार) भगवान व्यंकटेश्वराची पूजा केली व एकांत सेवेत देखील सहभाग घेतला. याचबरोबर त्यांनी आज अभिषेक सेवेत सहभागी होण्यासाठी देखील नोंदणी केली होती.

सरन्यायाधीश रामणा हे कुटंबीयांसह जेव्हा मंदिरात आले तेव्हा मंदिराच्या प्रवेशद्वारात त्यांचे वेद पंडितांनी मंत्रोच्चाराच्या घोषात स्वागत केले. सरन्यायाधीश म्हणून हा त्यांचा पहिला दौरा होता. सरन्यायाधीश रामणा हे आंध्र प्रदेशचे असून राज्यातील पहिले सरन्यायाधीश आहेत. त्यांनी पारंपारिक पद्धतीने दौरा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 7:22 pm

Web Title: chief justice of india nv ramana visits tirumala temple msr 87
Next Stories
1 भारत-बांगलादेश सीमेवर चीनी गुप्तहेराला अटक; BSF ची कारवाई
2 भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला अमेरिकेत परवानगी नाही; भारताला मोठा धक्का
3 मुकुल रॉय यांची घरवापसी!; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत मुलासह ‘टीएमसी’मध्ये प्रवेश
Just Now!
X