ज्यांच्या घरी स्वतंत्र शौचालयाची सुविधा असेल तरच विधानसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवार म्हणून त्यांचा विचार केला जाईल, अशा स्वरूपाची अट अनिवार्य करणे गरजेचे असल्याचे मत गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी व्यक्त केले. केवळ विधानसभेसाठीच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही अशा स्वरूपाच्या अटी लागू न केल्यास देशातील शौचालयांची परिस्थिती सुधारणे अवघड आहे, असेही पटेल यांनी नमूद केले.