29 February 2020

News Flash

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेकरिता मुख्यमंत्री दिल्लीत दाखल

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस शनिवारी दिल्ली दौर्‍यावर आहेत. फडणवीस नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत

| November 22, 2014 03:50 am

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस शनिवारी दिल्ली दौर्‍यावर आहेत. फडणवीस नवी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि एकूण राजकीय परिस्थिती याबद्दल दोघांमध्ये चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आज सकाळी साडेनऊच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी थेट ‘एचटी समेट’ला हजेरी लावली. त्यानंतर ते दिल्ली भाजपच्या कार्यालयात पोहचले. यावेळी फडणवीस यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत अमित शहांसह इतर काही नेत्यांना माहिती दिली. तसेच राज्यातील भाजपचे सरकार स्थिर हवे असेल तर शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केल्याचे कळते. दुसरीकडे, शुक्रवारी रात्री केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

First Published on November 22, 2014 3:50 am

Web Title: chief minister devendra fadanvis in delhi
Next Stories
1 फलोत्पादक शेतकऱ्यांना ५५३ कोटी
2 जनता दलाचे नेते शोएब इक्बाल काँग्रेसमध्ये
3 ‘टाइम’च्या ‘पर्सन ऑफ द इयर’साठी मोदी स्पर्धक
X
Just Now!
X