तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या समर्थकांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यांच्या या शुभेच्छामुळे काहींना आनंद जरी झाला असला तरी, पश्चिम बंगालमधील त्यांचे काही समर्थक नाराज देखील झाल्याचे दिसत आहेत.

ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी एका हिंदी ट्विटमध्ये भारतीयांना आणि भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर, हिंदी दिवसासाठी ममता बॅनर्जींच्या शुभेच्छा महत्वपूर्ण भवानीपूर पोटनिवडणुकीच्यी बरोबर आल्या आहेत. ममता बॅनर्जींची खूर्ची कायम रहावी, यासाठी येथील पोट निवडणुकीची मागणी केली गेलेली आहे.

दक्षिण कोलकातामधील भवानीपूर हा भाग कोलकातामधील सर्वात जुन्या भागांपैकी एक आहे, जिथं गैर-बंगाली मतदारांची संख्या जास्त आहे. संमिश्र लोकसंख्येसह बंगाली व्यतिरिक्त या ठिकाणी गुजराती, मारवाडी आणि पंजाबी भाषिक मतदारांचा समावेश आहे.