हरयाणा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यास दोन दिवस राहिलेले असतानाच विधानसभेचे अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि भाजपच्या दोन आमदारांना करोनाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले, असे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी सांगितले. विधानसभेतील सहा कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खट्टर यांनी सहा दिवसांपूर्वी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली होती. खट्टर यांना पीजीआयएमईआर रुग्णालयात सायंकाळी तपासणीसाठी नेण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
गुप्ता यांच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज उपाध्यक्ष रणबीर गंगवा पाहणार आहेत. गुप्ता यांनी सर्वाना केली आहे.
आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार गुप्ता यांनी, हरयाणा विधानसभा संकुलात येणाऱ्या सर्वाकडे करोनाची लागण झाली नसल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 12:26 am