News Flash

मध्य प्रदेशमध्ये आता असणार ‘गोमंत्रालय’

'आम्ही गोमंत्रालय स्थापन करु, तसेच गायींसाठी अभयारण्यही तयार करु

(संग्रहित छायाचित्र)

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची अजून घोषणा झालेली नाही. पण निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान घोषणांचा पाऊस पाडत आहेत. निवडणुकीपूर्वी शिवराज सिंह यांनी आणखी एक घोषणा केली आहे. मध्य प्रदेश राज्याच्या मंत्रालयामध्ये आता गोमंत्रालय असणार आहे. आज खुद्द मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशचे राजकारण गायीभोवती तापू लागल्याचं चित्र दिसून येत आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार आल्यास प्रत्येक पंचायत क्षेत्रात गोशाला बांधली जाईल, असे आश्वासन काँग्रेसने दिल्यानंतर शिवराज सिंह चौहान एक पाऊल पुढे आहेत. ‘आम्ही गोमंत्रालय स्थापन करु, तसेच गायींसाठी अभयारण्यही तयार करु,’ असे अश्वासन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी दिले आहे.

मध्य प्रदेशमधील मंत्री अखिलेश्वरानंद यांनी याआधीच म्हटले होते की, गायींसंदर्भात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करणार असून, गोमंत्रालय आवश्यक आहे. कारण तरच गोरक्षा आणि गोसेवेला चालना मिळेल.

भाजप गायींच्या नावावर केवळ राजकारण करते. मात्र काँग्रेस कधीच गायीला तडफडताना पाहू शकत नाही. त्यामुळे जर मध्य प्रदेशात आमचं सरकार आलं, तर रस्त्यांवर फिरणाऱ्या गायींसाठी गोशाला बांधू. प्रत्येक पंचायत क्षेत्रात गोशाला बांधू. जेणेकरुन रस्त्यांवर फिरणाऱ्या गायींना दुर्घटनेत दुखापत होणार नाही. असे वक्तव्य याआधी काँग्रेसचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनीही केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 10:57 pm

Web Title: chief minister shivraj singh chauhan announces cow ministry for madhya pradesh
Next Stories
1 केवळ ‘महिला कार्यकर्त्यां’ शबरीमला मंदिरात येतील!, टीडीबी अध्यक्षांचे मत
2 दहशतवाद मुद्द्यावर पाकिस्तानचा तिळपापड, आरएसएस-योगी आदित्यनाथांना केले टार्गेट
3 टेस्ट ट्युबद्वारे सिंहाच्या छाव्यांचा जन्म, जगातील पहिलाच यशस्वी प्रयोग
Just Now!
X