News Flash

सिगरेटपायी मुलाचा बळी

सिगरेट घेण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या १६ वर्षांच्या मुलाला परिसरातच राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा जीव

| August 12, 2013 04:43 am

सिगरेट घेण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या १६ वर्षांच्या मुलाला परिसरातच राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा जीव गेल्याची खळबळजनक घटना दिल्लीत नुकतीच उघडकीस आली.

संदीप असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून पूर्व दिल्लीतील पांडवनगरात तो राहत होता. तो नववीचा विद्यार्थी होता.
मारहाण करणारे तिन्ही तरुण संदीप राहत असलेल्या वसाहतीत राहतात.
या तिघांपैकी एकाने सिगरेट विकत घेण्यासाठी संदीपकडे पैसे मागितले होते. याबाबत संदीपने आपल्या आईला सांगितले होते. या गोष्टीचा राग येऊन तिन्ही आरोपी मुलांनी संदीपला मारण्याची योजना पार पाडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 4:43 am

Web Title: child killed for denying money for cigarette
Next Stories
1 पंजाब सरकारकडून विद्यार्थिनींना सायकली
2 जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा – मायावती
3 मोदी हे तर फेक देसी ओबामा – दिग्विजयसिंह
Just Now!
X