News Flash

मुलांच्या लसीला सप्टेंबरमध्ये मिळू शकते मान्यता; AIIMS च्या प्रमुखांची माहिती

एम्स पटना आणि एम्स दिल्लीमध्ये २ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी चालू आहे

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असतांना करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. करोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत वेगवेगळे कयास लावले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लवकरच भारतात येऊ शकते. तसेच या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुलांच्या लसीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळणार असल्याची शक्यता आहे, असे दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. डॉ. गुलेरिया म्हणाले, “कोव्हॅक्सिनच्या फेज II आणि III च्या चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. तसेच फायझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ते मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते.”

हेही वाचा- third Covid 19 wave : तिसरी लाट थोपवणे शक्य!

एम्स पटना आणि एम्स दिल्लीमध्ये २ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी चालू आहे. १२ मे रोजी डीसीजीआयने मुलांवर फेज II आणि III चाचणींसाठी भारत बायोटेकला मान्यता दिली होती.

करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलं कितपत प्रभावित होणार?

करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलं सर्वात जास्त प्रभावित होतील असं सांगितलं जात आहे. दरम्यान एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी करोनाच्या पुढील लाटेत लहान मुलं संक्रमित होतील, अशी माहिती देणारा भारतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही डेटा उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे. करोना स्थितीसंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी करोना लाटेमुळे लहान मुलांना अनेक गंभीर आजार होणार असल्याची माहिती चुकीची असल्याचं सांगितलं होतं.

“देशात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असा कोणताही डेटा उपलब्ध नाही ज्यामध्ये करोना लाटेत मुलं गंभीर संक्रमित होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे,” अशी माहिती रणदीप गुलेरिया यांनी यावेळी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 2:28 pm

Web Title: children vaccine can be approved in september information of the head of aiims srk 94
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 विश्वासार्हतेच्या बाबतीत भारतीय माध्यमांनी मारली बाजी, अमेरिकेलाही टाकलं मागे
2 काँग्रेसच्या सरकारमुळेच इंधन दरवाढीचा भडका उडालाय; पेट्रोलियम मंत्र्यांचा आरोप
3 १९ हजार किलो पिस्ता चोरणाऱ्याला पोलिसांनी केली अटक