News Flash

धक्कादायक ! रुग्णवाहिका नसल्याने मुलांनी रिक्षा ढकलत नेला वडिलांचा मृतदेह

मृत्यूनंतरही मिळेना न्याय

रुग्णवाहिका नाकारल्याने मुलांना आपल्या वडिलांचा मृतदेह सायकल रिक्षातून ढकलत न्यावा लागल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे आपल्या वडिलांना अशाप्रकारे नेणारा मुलगा दिव्यांग असूनही त्याच्यावर ही वेळ आली आहे. ही घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली असून आपल्या ५० वर्षाच्या वडिलांचा मृतदेह अशाप्रकारे नेण्याची वेळ या बहीण-भावांवर आली. गावातील आरोग्यकेंद्राकडून मृतदेह आणण्यासाठी कोणतीही मदत करण्यात न आल्याने त्यांना हा पर्याय स्विकारावा लागला. या मुलांनी आपल्या घरापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्रिवेदीगंज कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये मृतदेह नेला.

याबाबत आरोग्य केंद्रातील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आर. चंद्रा यांना विचारले असता, त्यांनी पूर्ण जिल्ह्यासाठी आपल्याकडे केवळ मृतदेह वाहून नेणाऱ्या केवळ दोन गाड्या आहेत. मात्र त्यावेळी त्या दोन्ही गाड्या उपलब्ध नसल्याने आपण सेवा देऊ शकलो नाही. याबरोबरच रुग्णवाहिकेतून मृतदेह आणता येत नाही असेही ते म्हणाले. याआधीही देशात अशाप्रकारे आपल्या नातेवाईकांचा मृतदेह खांद्यावरुन किंवा गाडीवरुन वाहून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मृत्यूनंतरही व्यक्तीला न्याय मिळत नसल्याने ही खऱ्या अर्थाने चिंतेची बाब आहे.

मागील वर्षी ओडिशामध्ये पत्नीचा मृतदेह आपल्या खांद्यावर घेऊन १२ किलोमीटरचे अंतर पायी कापणाऱ्या दाना मांझीचा व्हिडिओ पाहून सारे देशवासीय सुन्न झाले होते. रुग्णालयाचा ढिम्म कारभार आणि नाकर्तेपणामुळे पत्नीचा मृतदेह खांद्यावर वाहून नेणाऱ्या दाना मांझी आणि त्यांच्या मुलीला पाहून अनेकांचं काळीज पिळवटून निघालं होतं. त्यानंतर त्याला देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 6:33 pm

Web Title: childrens carry dead body of father on rickshaw in up
Next Stories
1 ४८ वर्षे सोबत राहील्यानंतर त्यांनी नातवंडांसमोर केले लग्न
2 ‘घरवापसी’ करणाऱ्या स्टिव्ह स्मिथसाठी एअर न्यूझीलंडची विशेष ऑफर
3 चहा विकून तिनं उभारलं २०० कोटींचं साम्राज्य
Just Now!
X