25 September 2020

News Flash

केजरीवालांवर मिरची पूड हल्ला हे भाजपाचे कारस्थान – आम आदमी पार्टी

मंगळवारी दुपारी एक तरुणाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न केला. आम आदमी पार्टीने या हल्ल्यासाठी भाजपाला जबाबदार धरले आहे.

दिल्ली सचिवालयात मंगळवारी दुपारी एक तरुण पोहोचला. त्याने केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली.

दिल्ली सचिवालयात मंगळवारी दुपारी एक तरुणाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न केला. आम आदमी पार्टीने या हल्ल्यासाठी भाजपाला जबाबदार धरले आहे. हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित होता. दिल्ली पोलिसांशी संगनमत करुन भाजपा मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचे कारस्थान रचत आहे असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

दिल्ली पोलिसांनी त्या तरुणाने अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली की, नाही ते अजूनही स्पष्ट केलेले नाही. त्या तरुणाकडे एक छोटी पिशवी होती. त्यात मिरची पूड असू शकते असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री आपल्या चेंबरबाहेर येत असताना अनिल नावाच्या व्यक्तीने आपल्या तक्रारीचा कागद केजरीवालांकडे दिला. त्यांनी तो आपल्या कर्मचाऱ्यांकडे दिला. त्यावेळी अनिल केजरीवालांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षरक्षकांनी त्याला दूर नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरु असताना केजरीवालांचा चष्मा खाली पडला. सुरक्षारक्षकांनी अनिलला बाजूला नेले. त्याच्याकडे एक पिशवी सापडली त्यात चिली पावडर असू शकते असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांच्या या माहितीनंतर आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली पोलीस मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्याचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हल्लेखोर नारायणा भागातील भाजपा नेत्याशी संबंधित आहे असा आरोप आपकडून करण्यात आला आहे.

अनिल शर्मा असे आरोपीचे नाव असून त्याची चौकशी सुरु आहे. अनिल शर्मा हा सचिवालयाच्या आत मिरची पावडर घेऊन कसा पोहोचला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा भेदण्यात तो यशस्वी झाल्याने दिल्ली पोलिसांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला आहे. यापूर्वी त्यांच्यावर शाईफेक, चप्पल फेकल्याचा प्रकारही घडला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 11:49 pm

Web Title: chilli powder attack on kejriwal aap alleges bjp conspiracy
Next Stories
1 काँग्रेस अहंकारी पक्ष, २०१९ ला आघाडी नाही-अखिलेश यादव
2 म्हशीला धडकून बस नदीत कोसळली, १२ प्रवाशांचा मृत्यू, ४६ जखमी
3 वर्षात १०० सुट्ट्यांमुळे कर्नाटक सरकार चिंतेत 
Just Now!
X