चीनने आपल्या शालेय अभ्यासक्रमात मोठा बदल केला आहे. आता प्राथमिक शालेय शिक्षणापासून महाविद्यालय शिक्षणात राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे धडे शिकवले जाणार आहेत. समाजवादाबाबत त्यांच्या विचार चीनच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिकणं अनिवार्य असणार आहे. चीनच्या शिक्षण याबाबतची माहिती दिली आहे. शी जिनपिंग यांचे विचार पाठ्यपुस्तकातून शिकवल्यास विद्यार्थ्यांना मार्क्सवादी विचारधार समजण्यास मद होईल, असंही त्यांनी पुढे सांगितलं. या अभ्यासक्रमाबाबत सूचना जारी करण्यात आली आहे.

“प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत चीन वैशिष्ट्यांसोबत समाजवादी विचार शिकवले जातील. यासाठी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे विचार पाठ्यपुस्तकात समाविष्ट केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि पक्षाचा संकल्प पूर्ण करण्यास मदत होणार आहे”, असं चीनच्या शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.

“करोनासोबत जगणं भारतीयांच्या अंगवळणी पडतंय”; WHOच्या शास्त्रज्ञांचा दावा

शी जिनपिंग २०१२ सालापासून चीनच्या राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत. जिनपिंग यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या ध्येय धोरणांचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. समाज, उद्योग, संस्कृती आणि शाळांमध्ये त्यांनी कम्युनिस्ट पक्षाबद्दल आत्मयितेची भावना रुजवली आहे. शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक माओ यांच्यासारखी आपली प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चीन महासत्ता होण्यास मदत झाली आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाने आपल्या स्थापनेचा शताब्दी सोहळा नुकताच साजरा केला. जगभरातील अनेक देशात साम्यवादी विचारांचे पक्ष अस्तित्वाची लढाई लढत असताना चीनमध्ये मात्र कम्युनिस्ट पक्ष तग धरुन आहे. चीनमध्ये जवळपास ७० वर्षे कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे.