News Flash

सीमारेषेवर भारत अतिआक्रमक; चीनचा कांगावा

पाकिस्तानची सीमा असल्यासारखेच भारतीय जवान आमच्याविरोधात आक्रमक झाले होते

सीमारेषेवर भारत अतिआक्रमक; चीनचा कांगावा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांचे संग्रहित छायाचित्र.

सीमेवर चीनची वर्तणूक पाहता भारतानेही सक्तीचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) भारतीय सैन्यदलावर आक्रमकतेचा आरोप केला आहे. नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासाठी भारत आणि चीन दरम्यान विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा झाली आहे. यात दोन्ही देशांनी सीमेवर शांतता राखण्यास सहमती दर्शवली आहे. गतवर्षी डोकलाममध्ये दोन्ही देशाचे सैन्य आमने-सामने उभे होते. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ सीमेवर तणावाचे वातावरण होते. दीर्घ चर्चेनंतर तेथील परिस्थिती नियंत्रणात आणणे दोन्ही देशांना शक्य झाले होते.

दोन्ही देशांमध्ये डिसेंबर महिन्यात विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा झाली होती. डोकलाम वाद निवळल्यानंतर भारत आणि चीनचे वरिष्ठ प्रतिनिधी पहिल्यांदाच आमने-सामने आले होते. आता पीएलएने एक निवेदन जारी करून भारतीय सुरक्षादलावर आक्रमकतेचा आरोप केला आहे. भारताने आपल्या सैन्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी चीनने केली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीएलएने सुरूवातीलाच भारतीय मुत्सद्यांकडे आपला आक्षेप नोंदवला होता. चीनी सेनेने म्हटले होते की, सीमेवर गस्ती दरम्यान भारतीय सुरक्षा दलांबरोबर झालेल्या वादावेळी त्यांचे जवान जखमी झाले होते. त्यावेळी चीनने भारतीय सुरक्षादलावर आक्रमकतेचा आरोप केला होता. पाकिस्तानची सीमा असल्यासारखे भारतीय जवान आमच्याविरोधात आक्रमक झाले होते, असे चीनने म्हटले. दरम्यान, दोन्ही देशात तणाव असला तरीही ४० वर्षांत एकदाही गोळीबाराची घटना घडलेली नाही.

दरम्यान, भारतीय सैन्यदल आणि आयटीबीपीने पीएलएचा आरोप फेटाळला आहे. उलट पीएलएनेच आक्रमक पवित्र स्वीकारला होता, असे भारतीय सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले. भारतीय सैन्य सीमेवरील गस्तीबाबत खूपच संवदेनशील आहे. सीमेवर शांतता राखण्यास ते प्रतिबद्ध असल्याचे भारताकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 1:47 pm

Web Title: china alleged indian security forces being aggressive on lac after india showing restraint
Next Stories
1 कुठे मिशी नी कुठे शेपूट; काँग्रेसची मोदींशी अशी तुलना केली केंद्रीय मंत्र्याने
2 रजनीकांतना भाजपाची संगत भोवणार?
3 बेंगळुरुत न्यू इअर पार्टीत तरुणीचा विनयभंग?
Just Now!
X