चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग भारत दौऱ्यावर येत असतानाच लडाखमधील चुमार आणि डेमचोक परिसरात चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे पुढे आले होते. सीमेवरील या घुसखोरीचा मुद्दा दोन्ही देशांच्या नेत्यांच्या चर्चेत आल्यानंतर गुरुवारपासून आपले सैन्य मागे घेण्यासही चीनने सुरुवात केली होती. मात्र, जिनपिंग यांचा दौरा संपताच चिनी ‘ड्रॅगन’ पुन्हा विखारी फुत्कार सोडू लागला असून सीमावर्ती भागात भारताकडूनच आमची कुरापत काढली जात असल्याचा आरोप चीनने केला. महत्त्वाची द्विपक्षीय बैठक आली की भारताकडून मूळ प्रश्नापासून लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी ‘पद्धतशीर’ प्रयत्न केले जातात, असा गंभीर आरोपही चीनने केला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या दिल्ली बैठकीच्या पाश्र्वभूमीवर आपली बाजू भक्कमपणे मांडता यावी आणि चर्चेमध्ये आपल्याला झुकते माप मिळावे यासाठी भारताकडून ‘आक्रमक’ युद्धनीती वापरली जात असल्याचे आक्षेप चीनमधील एका ‘थिंक टँक’ने नोंदवले आहेत. तर सरकारी धोरणांचा पुरस्कार करणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ या दैनिकाने घुसखोरीबाबत प्रथमच भाष्य करताना ‘मोदी यांनी घुसखोरीबाबत चिंता प्रकट केल्याचे’ वृत्त दिले आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र या प्रकरणावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तातडीने आणि प्रगल्भपणे चर्चेद्वारे या प्रश्नावर योग्य वेळी नियंत्रण मिळवण्यात आल्याचा’ दावा चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केला आहे. मात्र चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स’ने ‘अज्ञात निरीक्षकांनी भारताकडूनच सीमाप्रश्नावरून चिथावणी दिली जात असल्याचे म्हटले’, असे वृत्त दिले आहे. या ‘अज्ञात तज्ज्ञाने’ आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ दिलेले उदाहरणही ग्लोबल टाइम्सने उद्धृत केले आहे. गेल्या वर्षी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या भारत दौऱ्याच्या वेळी पश्चिम सीमेवर असाच तणाव ‘निर्माण करण्यात आला’ होता, असा दावा या तज्ज्ञाने केला असल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे.
चीनच्या अध्यक्षांच्या भारत दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर लडाखमधील चुमार आणि डेमचोक प्रांतात चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे पुढे आले होते. इतकेच नव्हे तर, गुरुवारपासून आपले सैन्य मागे घेण्यासही चीनने सुरुवातच केली होती. मात्र, अध्यक्ष जिनपिंग यांचा दौरा संपताच चिनी ‘ड्रॅगन’ने विखारी फुत्कार सोडायला पुन्हा सुरुवात केली. सीमावर्ती भागात भारताकडूनच आम्हाला चिथावणी दिली जात असल्याचा आरोप चीनने केला. तसेच अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय बैठक आली की भारताकडून मूळ प्रश्नापासून लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी ‘पद्धतशीर’ प्रयत्न केले जातात, असा गंभीर आरोपही चीनने केला.
सीमाप्रश्न सुटणार नाही..
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या कारकिर्दीत उभय देशांमधील सीमाप्रश्न सुटण्याची शक्यता सुतराम नाही. भारत आपल्याला कायमच सीमाप्रश्नाचा बळी मानत आला आहे आणि मोदी या मानसिकतेतून भारतीयांची सुटका करू शकतील, असे वाटत नाही, असे भाकित दक्षिण आशियाई अभ्यास केंद्रातील एका तज्ज्ञ अभ्यासक महिलेने वर्तवले आहे.

china blames india for dispute at border
china india, india and china relations,  dispute at border, loksatta news, loksatta, marathi news, marathi    
दौरा संपताच ‘ड्रॅगन’चे विखारी फुत्कार
सीमावर्ती भागात भारतच कुरापती काढतो
पीटीआय, बीजिंग