22 November 2019

News Flash

चीनने लष्करासाठी सीमेजवळ उभारले ‘वेदर स्टेशन’, भारतासाठी धोक्याची घंटा ?

भारताला लागून असणाऱ्या सीमेवर तिबेटमध्ये चीनने वातावरणाची माहिती देणारे मानवरहीत स्वयंचलित वेदर स्टेशन उभारले आहे. आपल्या लष्कराच्या मदतीसाठी चीनने हे वेदर स्टेशन उभारले.

भारताला लागून असणाऱ्या सीमेवर तिबेटमध्ये चीनने वातावरणाची माहिती देणारे मानवरहीत स्वयंचलित वेदर स्टेशन उभारले आहे. आपल्या लष्कराच्या मदतीसाठी चीनने हे वेदर स्टेशन उभारले असून संघर्ष, तणावाच्या परिस्थितीत चीनच्या लष्कराला या वेदर स्टेशनची मोठी मदत होणार आहे. भारताला लागून असणाऱ्या सीमांवर आणखी असे वेदर स्टेशन्स उभारण्याची चीनची योजना आहे.

तिबेटमधील हुंझे काउंटीमधील युमाई शहरात हे वेदर स्टेशन आहे. या वेदर स्टेशनकडून मिळणाऱ्या माहितीचा वाहतूक आणि दळणवळणासाठी उपयोग होईल असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. वेदर स्टेशनकडून मिळणाऱ्या हवामान विषयक माहितीमुळे चीनची सुरक्षा अधिक बळकट व्हायला मदत होईल तसेच चीनला सीमेवरील हालचालींचे नियोजनही करता येईल असे तिबेट वेदर ब्युरोच्या वेबसाईटवर म्हटले आहे.

युद्धाच्या काळात मिसाइल डागणे तसेच विमनांचे टेकऑफ-लँडिंग यावर हवामानाचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे या वेदर स्टेशनमुळे चीनला काही प्रमाणात नक्कीच फायदा होईल. भारत आणि चीनमध्ये १९६२ मध्ये युद्ध झाले होते. त्यानंतर डोकलाममध्ये मागच्यावर्षी दोन्ही देशांचे सैन्य अडीच महिने आमने-सामने उभे ठाकले होते. अशावेळी या वेदर स्टेशनचा निश्चित लाभ होईल. हे वेदर स्टेशन हवेतील तापमान, हवेचा दाब, वाऱ्याच वेग, वाऱ्याची दिशा, हवेतील आद्रता याचा आढावा घेईल.

 

 

First Published on July 17, 2018 6:13 pm

Web Title: china builds weather station at border with india
टॅग Border,China,India
Just Now!
X