17 January 2021

News Flash

अंधार असल्यानं रस्ता चुकला; चीनकडून ‘त्या’ सैनिकाला सोडण्याची मागणी

पूर्व लडाखमध्ये भारतीय जवानांनी घेतलं होतं ताब्यात

संग्रहित छायाचित्र/पीटीआय

पूर्व लडाखमधील चुशूल सेक्टरमध्ये असलेल्या गुरंग हिल भागात एका चिनी सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतलं होते. पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराचा हा जवान शनिवारी भारतीय हद्दीत शिरला होता. या सैनिकाला तात्काळ सोडण्याची मागणी चीनकडून करण्यात आली आहे. अंधार असल्यानं तो सैनिक रस्ता चुकला, असं चीनकडून सांगण्यात आलं आहे.

पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल भागात शनिवारी भारतीय लष्कराने चीनच्या एका सैनिकाला पकडलं होतं. चिनी लष्कराचा हा जवान भारतीय हद्दीत आला होता, त्यावेळी जवानांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. या सैनिकाला परत देण्याची मागणी चीनकडून करण्यात आली आहे.

रात्रीच्या अंधारात आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे हा जवान भारत-चीन सीमेवर बेपत्ता झाला होता. त्यानंतर याची माहिती भारतीय लष्कारालाही देण्यात आली होती. जेणेकरून भारताकडून त्याला शोधण्यासाठी मदत होईल, असं चिनी लष्कराच्या एका ऑनलाईन साईटवर ही माहिती देण्यात आली आहे. दोन तासानंतर भारतीय लष्कराच्या बाजूने प्रतिसाद देण्यात आला. बेपत्ता असलेला सैनिक भारतीय लष्कराला मिळाल्याचं भारताकडून सांगण्यात आलं आहे. लवकरच हा सैनिक चीनकडे परत केला जाणार असल्याचं या साईटवरून चिनी लष्करानं म्हटलं होतं.

दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण…

जून महिन्यात पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यानंतर पँगाँग सरोवराच्या परिसरात गोळीबाराच्या घटनाही घडल्या आहेत. चीन पँगाँग सरोवराच्या फिंगर फोर भागातून माघार घेत नाहीय. याच भागातील महत्त्वाच्या टेकडया भारतीय सैन्याने आपल्या ताब्यात घेऊन चीनवर रणनितीक दृष्टीने वर्चस्व मिळवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 10:58 am

Web Title: china calls for immediate return of soldier held by india bmh 90
Next Stories
1 पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट; ‘गोएअर’ने पायलटला तडकाफडकी कामावरून काढले
2 इंडोनेशियात विमान समुद्रात कोसळले, ६२ जणांना जलसमाधी
3 लसीकरण १६ तारखेपासून
Just Now!
X