21 September 2020

News Flash

चीनमध्ये कारहल्ला; सहा ठार, पोलिसांच्या गोळीबारात चालकाचा मृत्यू

ह्युबेई प्रांतातील झाओयांग शहरात शुक्रवारी सकाळी वेगवान कार अचानक गर्दीत घुसली. नेमके काय झाले हे समजण्याआधीच कारने अनेकांना धडक दिली.

चीनमधील ह्युबेई येथे गजबजलेल्या परिसरात बेदरकारपणे कार घुसवल्याने सहा जण ठार झाले. तर सहा ते सात जण जखमी झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी चालकाला रोखण्यासाठी गोळीबार केला असून या गोळीबारात चालकाचा मृत्यू झाला आहे.

ह्युबेई प्रांतातील झाओयांग शहरात शुक्रवारी सकाळी वेगवान कार अचानक गर्दीत घुसली. नेमके काय झाले हे समजण्याआधीच कारने अनेकांना धडक दिली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहनचालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. अखेर पोलिसांनी चालकाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात चालकाचा मृत्यू झाला आहे.

चालकाच्या कारमधून जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरुन त्याने जाणूनबुजून हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अशा स्वरुपाच्या घटना वाढल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 9:02 am

Web Title: china car hits crowd in zaoyang city in hubei province several dead driver shot by police
Next Stories
1 काश्मीरमध्ये २४ तासांमध्ये तीन चकमकी, पाच दहशतवाद्यांचा खात्मा
2 भाजपात आडवाणी युगाचा अस्त ?
3 शेतमजुरी क्षेत्रातील रोजगारात ४० टक्क्यांनी घट
Just Now!
X