01 October 2020

News Flash

करोनाचे नमूने नष्ट केल्याची चीनकडून कबुली, अमेरिकेचा दावा ठरला खरा

चीनने आपण अनधिकृत प्रयोगशाळांना करोनाचे नमूने नष्ट करण्याचा आदेश दिला होता अशी माहिती दिली आहे

या वर्षातच करोना व्हायरसला रोखणारी लस पूर्णपणे विकसित करु असा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे. द हिंदूने हे वृत्त दिले आहे.

चीनने आपण करोनाचे नमूने नष्ट केल्याची कबुली दिली आहे. चीनने आपण अनधिकृत प्रयोगशाळांना करोनाचे नमूने नष्ट करण्याचा आदेश दिला होता अशी माहिती दिली आहे. पण यावेळी त्यांनी जैविक सुरक्षेच्या हेतून हे नमूने नष्ट करण्यात आल्याचा दावा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे चीनने दिलेल्या या कबुलीमुळे अमेरिकेकडून करण्यात आलेला दावा खरा ठरला आहे. Newsweek ने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ्य आयोगाचे निरीक्षक यू डेंगफेंग यांनी हा खुलासा केला आहे. बिजिंग येथे पत्रकारांना माहिती देताना त्यांनी सांगितलं की, “करोना रुग्णांचे नमूने नष्ट करण्यात आले. जैविक प्रयोगशाळांच्या सुरक्षेसाठी तसंच या अज्ञात रोगापासून अन्य कोणता धोका निर्माण होऊ नये यासाठी हे नमूने नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक स्वास्थ्य कायद्यांतर्गत हे नमूने नष्ट करण्यात आले आहेत”. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी चीन करोनाचा फैलाव सुरु झाल्याच्या सुरुवातीच्या दिवसांमधील म्हणजेच डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेला करोना रुग्णांची नमूने देण्यास नकार देत असल्याचं म्हटलं होतं. सोबतच चीनने हे नमूने नष्ट केले असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता चीनकडून ही कबुली देण्यात आली आहे.

यू डेंगफेंग यांनी यावेळी इतर देशांपासून करोनाची माहिती लपवण्याच्या हेतून हे नमूने नष्ट करण्यात आले नसून, जैविक सुरक्षेच्या हेतूनेच निर्णय घेण्यात आल्याचंही सांगितलं. “करोनाचं पहिलं प्रकरण समोर आल्यापासून राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ त्यावर लक्ष ठेवून यामागील कारणांचा शोध घेत होते,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी चीनवर आरोप करताना म्हटलं होतं की, “चीनी कम्युनिस्ट पक्षाने करोनाचा किती फैलाव झाला आहे याची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. कशा पद्दतीने त्याचा फैलाव होत आहे याची माहितीही दिली नाही. जागतिक आरोग्य संघटनेपासूनही माहिती लपवण्यात आली”. यावेळी त्यांनी करोनासंबंधी तसंच रुग्णसंख्येची योग्य माहिती न दिल्याचाही आरोप केला होता. सोबतच चीनने कोरोनाचे नमुने नष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

करोनामुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध ताणले गेले असतानाच ही बातमी आली आहे. यामुळे तणाव अजून वाढण्याची चिन्हे आहेत. अमेरिका वारंवार करोना व्हायरसच वुहान येथील प्रयोगशाळेतून बाहेर पडल्याचा आरोप करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील अनेकदा जाहीरपणे चीनवर आरोप केले असून हा ‘चायनीज व्हायरस’ असल्याचं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 4:24 pm

Web Title: china confirms destroying samples of the coronavirus sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 बांगलादेश आठवतंय का?? काश्मीर प्रकरणी ट्वीट करणाऱ्या आफ्रिदीला गंभीरने सुनावलं
2 केंद्राकडून राज्यांना सर्वोतोपरी मदत, ४६ हजार कोटींचं वाटप; निर्मला सीतारामन यांची माहिती
3 निर्मला सीतारामन यांनी केली सोनिया गांधींना हात जोडून विनंती, म्हणाल्या…
Just Now!
X