28 September 2020

News Flash

अचानक चीनमधील मृतांचा आकडा ५० टक्क्यांनी वाढला

करोनाबाधित रुग्णांची संख्या व मृतांची संख्या यांची सुधारित आकडेवारी जारी केली

(संग्रहित छायाचित्र)

जगभरात करोना व्हायरस या महामारीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली आहे. चीनच्या वुहान शहरातून उद्भवलेल्या करोना या व्हायरसमुळे जगात हाहाकार माजला आहे. चीनमध्ये सुरूवातील करोना व्हायरस आटोक्यात आल्याचं म्हटले होते मात्र, आता नव्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये चीनमध्ये पुन्हा कोरोनाने हैदोस घातला असून मृतांचा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत चीनमध्ये अचानक मृत्यूचा आकडा ५० टक्केंनी वाढला आहे.

चीनने शुक्रवारी रात्री करोना व्हायरसमुळे बळी गेलेल्यांच्या संख्येची सुधारित माहिती जारी केली आहे. या आकडेवारीनुसार चीनमध्ये ४,६३२ लोक करोना व्हायरसमुळे मरण पाववे आहेत. वुहानमध्ये मृतांचा आकडा आता १२९० ने वाढवण्यात आला असून मृतांची नोंद योग्यप्रकारे झाली नव्हती अशी कबुली प्रशासनाने दिली आहे.

वुहान महापालिकेने शुक्रवारी करोनाबाधित रुग्णांची संख्या व मृतांची संख्या यांची सुधारित आकडेवारी जारी केली आहे. वुहानमध्ये आता निश्चित रुग्णांची संख्या ३२५ ने वाढून ती ५०,५३३ झाली आहे, तर मृतांची संख्या १२९० ने वाढली आहे. देशात एकूण रुग्णांची संख्याही ८२,६९२ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 1:04 pm

Web Title: china coronavirus death toll update nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 लॅबमधल्या इंटर्नकडून अपघाताने Covid-19 व्हायरस लीक झाला, अमेरिकन मीडिया
2 मोबाईल विकून धान्य आणलं अन् घरातच गळफास लावून केली आत्महत्या
3 Coronavirus: संयुक्त राष्ट्र प्रमुखांचा भारताला ‘सलाम’, जगाला मदतीचा हात दिल्याबद्दल कौतुक
Just Now!
X