News Flash

मुस्लिमांची लोकसंख्या कमी करण्यासाठी चीननं केले हे अघोरी उपाय

सक्तीने नसबंदी, गर्भपातासारख्या उपायोजना

संग्रहित छायाचित्र

अमेरिका, ब्रिटन सारख्या बडया राष्ट्रांबरोबर संघर्ष करणारा चीन आपल्याच देशातील मुस्लिमांवर अत्याचार करत आहे. उइगर मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्यांकांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनने अघोरी उपायोजना केल्या आहेत. लोकसंख्येच्या मुद्दावर चीनची एकूणच भूमिका दुटप्पी आहे. कारण उइगर मुस्लिमांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी चीन अघोरी उपायोजना करतोय, त्याचवेळी हान बहुसंख्यांकांची लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

सरकारी आकडे, राज्याची कागदपत्रे आणि डिटेंशन सेंटरममध्ये राहिलेल्या ३० जणांबरोबर बोलल्यानंतर उइगर आणि अन्य अल्पसंख्यांकांची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी चीनकडून सक्तीने अघोरी उपायोजना केल्या जात असल्याचे समोर आले आहे. शिनजियांग प्रांतामध्ये मागच्या चार वर्षांपासून चीनकडून हे सर्व पद्धतशीरपणे सुरु आहे. असोसिएटेड प्रेसने कागदपत्रांची तपासणी तसेच तिथल्या डिटेंशन सेंटरमधल्या नागरिकांशी बोलल्यानंतर हे वृत्त दिले आहे.

चीनमधल्या सरकारी यंत्रणेकडून तिथल्या अल्पसंख्यांक महिलांच्या गर्भधारणेवर लक्ष ठेवले जाते. शेकडो हजारो जणांची नसबंदी, महिलांना गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले आहे. संपूर्ण देशभरात नसबंदी कमी झाली असली तरी शिनजियांगमध्ये हे प्रमाण जास्त आहे. जास्त मुले असणं हे चीनमध्ये नागरिकांना डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्याचे एक कारण आहे. तीन किंवा चार मुले असणाऱे पालक दंडाची मोठी रक्कम भरत नाहीत, तो पर्यंत त्यांना डिटेंशन सेंटरमध्ये डांबले जाते. मुलांना लपवून तर ठेवले नाही ना? हे तपासण्यासाठी घरावर छापे मारले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 6:45 pm

Web Title: china cuts uighur births with iuds abortion sterilization dmp 82
Next Stories
1 “जे लोक नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना…” मोदींनी प्रशासनाला दिल्या ‘या’ सूचना
2 बोलायचं होतं चीनवर, पण बोलले…; ओवेसींचा मोदींना शालजोडीतला टोला
3 …ये बता कि क़ाफ़िला कैसे लुटा, मोदींच्या भाषणावर राहुल गांधींचा अप्रत्यक्ष टोला
Just Now!
X