02 June 2020

News Flash

करोना संकटकाळातही चीननं केली डिफेन्स बजेटमध्ये वाढ

हे बजेट भारताच्या डिफेन्स बजेटच्या तिप्पट आहे.

करोना व्हायसरनं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात ओढलं आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जग करोनाचा सामना करण्याचे तसेच आपली आरोग्यसेवा बळकट करण्याचे प्रयत्न करत आहे. अशा संकटकाळातही चीन आपल्या संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी अधिक जोर देताना दिसत आहे. चीननं आपल्या डिफेन्स बजेटमध्ये वाढ करून ते १७९ अब्ज डॉलर्स करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेनंतर संरक्षण क्षेत्रात सर्वाधिक खर्च करणारा चीन हा दुसरा देश आहे.

चीनचं डिफेन्स बजेट भारताच्या डिफेन्स बजेटच्या तुलनेत तिप्पट आहे. गेल्या वर्षी चीनचे डिफेन्स बजेट १७७.६ अब्ज डॉलर्स होते. सद्य परिस्थितीत पाहता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चीननं आपल्या डिफेन्स बजेटमध्ये कमी वाढ केली आहे. करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला बसलेली खिळ हे यामागचं मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चीन आणि अमेरिकेतही वाद सुरू आहेत. तसंच करोना व्हायरसच्या प्रसारासाठी अमेरिकेनं चीनलाच जबाबदार धरलं आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेतील वाद हे मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत यावेळीही डिफेन्स बजेटमध्ये करण्यात आलेली वाढ महत्त्वाची मानली जात आहे.

शुक्रवारी चीननं सादर केलेल्या मसुद्यातील माहितीनुसार २०२० मध्ये चीनच्या डिफेन्स बजेटमधील वृद्धी दर हा ६.६ टक्के राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर २० लाख जवानांसह चीनचं सैन्य हे जगातिल सर्वात मोठं सैन्य ठरणार आहे. सलग पाचव्या वर्षी चीननं आपल्या डिफेन्स बजेटमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी वाढ केली असल्याची माहिती चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआ न्यूजनं दिली आहे. डिफेन्स बजेटच्या मसुद्यानुसार यावर्षी चीनचं डिफेन्स बजेट १ हजार २७० अब्ज युआन म्हणजेच १७९ अब्ज डॉलर्स इतकं असणार आहे.

पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

एका अहवालानुसार २०१९ मध्ये चीनचा संरक्षण क्षेत्रातील खर्च अमेरिकेच्या तुलनेत एक चतुर्थांश होता. अनेकदा चीनच्या डिफेन्स बजेटमधील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दरम्यान नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या (एनसीपीचे) प्रवक्ते झांग युसुई यांनी मात्र डिफेन्स बजेमध्ये पारदर्शकता असल्याचं म्हटलं आहे. चीनच्या सैन्याचा आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा विस्ताह हा त्यांच्या घोषणेपेक्षा अधिक असल्याचं मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचं व्यक्त केलं आहे. सरंक्षण क्षेत्रात चीन कोणताही छुपा खर्च करत नसल्याचंही युसुई यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 7:58 am

Web Title: china defense budget increased usd 179 billion three times of india amid covid19 pandemic us tension jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 चोवीस तासांत सहा हजार नवे रुग्ण
2 पश्चिम बंगालला आणि ओडिशाला अंतरिम साहाय्य
3 कराचीत निवासी भागात विमान कोसळून ६० ठार
Just Now!
X