चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) पूर्व लडाखमधील जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला असे भारताच्या संरक्षण दलांचे प्रमुख जन. बिपिन रावत यांनी केलेले वक्तव्य वस्तुस्थितीशी पूर्णपणे विसंगत असल्याचे गुरुवारी चीनच्या लष्कराने म्हटले आहे.

भारत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही, उत्तरेकडील सीमेवरील जैसे थे स्थिती बदलण्याचे प्रयत्न झाले ते भारताने ठामपणे टाळले, असे जन. रावत म्हणाले होते त्यानंतर चीनच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने वरील मत व्यक्त केले. बळाचा वापर न करता फूट पाडण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून जैसे थे स्थिती बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला, भारत दबावासमोर झुकेल, असे त्यांना वाटले होते, असे जन. रावत म्हणाले होते.