पेंटॅगॉनच्या अहवालात इशारा
चीनने संरक्षण क्षमता वाढवली असून भारतीय सीमेवर मोठय़ा प्रमाणात सन्य तनात केले आहे असे अमेरिकेच्या पेंटॅगॉन या संरक्षण विभागाने म्हटले आहे. पाकिस्तानसह इतर अनेक ठिकाणी चीनचे लष्करी अस्तित्व वाढत चालले आहे असेही पेंटगॉनचे मत आहे. पूर्व आशिया विभागाचे उपसहायक संरक्षण मंत्री अब्राहम एम. डेन्मार्क यांनी सांगितले की, भारताच्या सीमेलगत चीनने कुमक वाढवली आहे असे आम्हाला निदर्शनास आले आहे. पेंटॅगॉनचा २०१६ या वर्षांतील वार्षकि अहवाल सादर करण्यात आल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.‘चीन प्रजासत्ताकाच्या लष्करी व सुरक्षा हालचाली’ या विषयावर हा अहवाल सादर करण्यात आला. डेन्मार्क यांनी असे सांगितले की, चीनने भारतीय सीमेलगत कुमक वाढवण्याचे खरे कारण समजणे अवघड आहे. अंतर्गत स्थिरतेचा उद्देश यात किती आहे व बाह्य शक्तींच्या पासून संरक्षणाचा भाग किती आहे, हे सांगणे अवघड आहे. चीन लष्करात आधुनिकता आणून धाक जमवित आहे काय असे विचारले असता त्यांनी सांगितले की, कुमक वाढवण्यामागची कारणे निश्चित सांगता येत नाहीत. संरक्षण मंत्री अशटन कार्टर यांनी अलीकडेच भारताचा दौरा केला होता त्याबाबत विचारले असा ते म्हणाले की, त्या दौऱ्याची फलश्रुती सकारात्मक होती. भारताशी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य यापुढेही कायम राहील. त्यामागे चीन हे कारण नाही तर भारत हा एक मोठा भागीदार असलेला मौल्यवान देश आहे. जगात सगळीकडेच चीनचे तळ वाढत आहेत. पाकिस्तानात चीनचे तळ जास्त आहेत. चीन व पाकिस्तान यांची गाढ मत्री पूर्वीपासून आहे.
चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर आíथक हितसंबंधांचा विकास करीत असून त्यात नौदल दूरस्थ सागरी प्रदेशात चिनी नागरिक, गुंतवणूक व दळणवळण यंत्रणांचे संरक्षण करण्यास सज्ज आहे. चीन त्याच्या मित्र देशांमध्ये आणखी नाविक तळ उभारण्याची शक्यता जास्त आहे. त्यात पाकिस्तानचाही सहभाग असेल. पेंटॅगॉनच्या अहवालात म्हटले आहे की, चिनी लष्कर भारतीय सीमेवर मोर्चेबांधणी करीत आहे ही चिंतेची बाब आहे. भारत-चीन सीमेवर वादग्रस्त भागांचे दुखणे कायम असून दोन्ही बाजूंकडून लष्करी गस्त सुरू आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये उत्तर लडाखमध्ये चीन व भारत यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांत ध्वज बठक ही पाच दिवसांच्या कुरबुरीनंतर झाली व नंतर शांतता पाळण्याचे आश्वासन देण्यात आले. दोन्ही देशांची सन्यदले त्यानंतर नेहमीच्या ठिकाणी परत गेली होती. पेंटॅगॉनने म्हटले आहे की, भारत व चीन यांच्यातील सीमा ४०५७ कि.मी लांबीची आहे. अरूणाचल प्रदेशवरून दोन्ही देशात खटके उडत असतात. चीनच्या मते अरूणाचल हा तिबेटचा म्हणजे पर्यायाने चीनचा भाग आहे. तिबेट पठाराच्या पश्चिम टोकाकडील अक्साय चीन भागातही अधूनमधून कुरबुरी चालू असतात असे असले तरी भारत व चीन यांच्यात राजकीय व आíथक संबंध दृढ आहेत.