News Flash

पाकिस्तानातील ग्वादार बंदराच्या विकासासाठी चीनचे अर्थसाह्य़

पाकिस्तानातील ग्वादार बंदराच्या विकासासाठी चीन अर्थपुरवठा करीत असून भविष्यात या बंदराचा वापर लष्करी वापरासाठी होऊ शकतो, असे संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. ग्वादार बंदराबाबतच्या

| August 8, 2013 02:14 am

पाकिस्तानातील ग्वादार बंदराच्या विकासासाठी चीन अर्थपुरवठा करीत असून भविष्यात या बंदराचा वापर लष्करी वापरासाठी होऊ शकतो, असे संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टनी बुधवारी राज्यसभेत सांगितले.
ग्वादार बंदराबाबतच्या घडामोडींवर सरकारचे बारकाईने लक्ष असून या बंदराचा ताबा एका चिनी कंपनीला देण्यात येणार असल्याच्या वृत्ताबाबतही भारत दक्ष आहे. भविष्यात या बंदराचा लष्करी कारवायांसाठी वापर होऊ शकतो. याबाबत भारताने यापूर्वीच चिंता व्यक्त केली असून चीन आता पाकिस्तानच्या विनंतीवरून या बंदराचे बांधकाम करीत आहे. ही चिंतेची बाब आहे असे सरळ आणि स्पष्ट आपले उत्तर असल्याचेही अ‍ॅण्टनी यांनी या वेळी सांगितले. भारतीय सागरी क्षेत्रात चीनच्या कारवाया वाढल्या आहेत का, असे विचारले असता संरक्षणमंत्री म्हणाले की, बंदरांचा विकास, खोल समुद्रात खाणकाम, सागरी संशोधन आणि चाचेविरोधी कारवायांमध्ये चीन सहभागी होऊ लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2013 2:14 am

Web Title: china help to pakistan for creating the port
टॅग : China,Pakistan,Port
Next Stories
1 नीरा राडिया ध्वनिफीतप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना फटकारले
2 जवान शहीद होण्यासाठीच असतात – बिहारमधील मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
3 कालचे निवेदन उपलब्ध माहितीवर आधारित – संरक्षणमंत्री
Just Now!
X