News Flash

दक्षिण चिनी सागरात चीनची दंडेली; फिलिपाइन्सच्या बोटींची अडवणूक

अध्यक्ष रॉड्रिगो डय़ुटर्ट यांच्या चीनशी मैत्रीनंतरही चीनने हा तंटा निर्माण केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मनिला, फिलिपाइन्स : फिलिपाइन्सच्या  गस्त घालणाऱ्या बोटींना दक्षिण चीन सागरात चीनने विरोध केला असून या प्रकाराचा फिलिपाइन्सने निषेध केला आहे. फिलिपाइन्सच्या परराष्ट्र खात्याने आतापर्यंत चीनच्या अशा अनेक कृत्यांचा निषेध केला. फिलिपाइन्सचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी व संरक्षण प्रमुख यांचा निषेध करणाऱ्यांत समावेश आहे.

अध्यक्ष रॉड्रिगो डय़ुटर्ट यांच्या चीनशी मैत्रीनंतरही चीनने हा तंटा निर्माण केला आहे. परराष्ट्र सचिव टिओडोरो लॉस्किन यांनी चीनच्या या कृत्याबाबत ट्विट संदेशात काही अश्लील शब्दांचा वापर करून फिलिपाइन्सच्या अधिकार क्षेत्रातील भागातून चीनने माघारी जावे अशी मागणी केली. दोन देशांची मैत्री असताना तुम्ही काय चालवले आहे असा सवालही त्यांनी केला. संरक्षण मंत्री डेल्फिन लोरेन्झाना यांनी या भागातून गस्ती नौका मागे घेण्याची चीनची मागणी फेटाळून लावली आहे.  चीनच्या लष्कराची क्षमता आमच्यापेक्षा जास्त आहे हे आम्ही मान्य करतो, पण म्हणून त्यांनी आमच्या राष्ट्रीय हिताच्या आड येऊ नये. आमच्या सभ्यतेचा त्या देशाने अंत पाहू नये असे त्यांनी म्हटले आहे.

फिलिपिनी तटरक्षक नौकांना विरोध करण्याचा प्रयत्न २४ व २५ एप्रिल रोजीच्या कवायतींवेळी चीनने केला होता. वायव्य फिलिपाइन्समधील क्षेत्रात हा प्रकार झाला होता. दोन्ही देशांनी दक्षिण चिनी सागरात मासेमारी करण्याचा हक्क असल्याचा दावा केला असला तरी चीनने फिलिपाइन्ससह इतर तटरक्षक दलांचे गस्तीचे व मच्छीमारीचे अधिकार काढून घेत असल्याचा दावा केला आहे. फिलिपाइन्सच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे, की  चीनच्या मच्छीमार बोटींनी आमच्या क्षेत्रात येऊन मासेमारी करणे बेकायदेशीर आहे. जानेवारी ते मार्च या  काळात चीनची जहाजे स्कारबरो ते थितू बेटे या परिसरात दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 1:51 am

Web Title: china in the south sea obstructed philippine coastguard ship zws 70
Next Stories
1 भारतात लसमान्यता प्रक्रियेस वेग देण्याची फायझरची मागणी
2 कोविशिल्डच्या ११ कोटी मात्रांसाठी केंद्राकडून १७०० कोटी अदा
3 Coronavirus : देशात २४ तासांत ३,४१७ करोनाबळी
Just Now!
X