News Flash

अबब! चीनच्या समुद्रावर जगातल्या सर्वात मोठ्या पुलाची बांधणी

या पुलासाठी १७.३ अब्ज डॉलर इतका खर्च आला आहे. याच्या बांधणीचा खर्च हाँगकाँग, झुहाई आणि मकाऊ या तिन्हीच्या सरकारने मिळून केला आहे.

चीनमधील झुहाई याठिकाणी जगातला सर्वात मोठा सागरी पूल बांधण्यात आला आहे. हा पूल हाँगकाँग आणि मकाऊ या तिन्ही ठिकाणांना जोडणार आहे. या पुलावर दोन्ही बाजूला तिहेरी रस्ते असून तो समुद्रापासून २२.९ किलोमीटरवर आहे. तर समुद्राच्या खाली ६.७ किलोमीटरवर आहे. या पूलाचे खांब बांधण्यासाठी ४ लाख टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. या पुलाला भूकंपाचा धोका उद्भवू नये यासाठी त्यात विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात आली आहे. ८ रिश्टर स्केलचा भूकंप आला तरीही या पुलाला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे.

झुहाई येथून हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी चार तास लागतात. मात्र या पुलामुळे ही वेळ कमी होऊन अवघ्या पाऊण तासात हे अंतर कापले जाते. या प्रकल्पाला नावे ठेवणाऱ्यांची संख्याही कमी नाही. या पुलाच्या माध्यमातून चीन हाँगकाँग आणि मकाऊवर आपले नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. चीनमधील तीन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा पूल सर्वच दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे व्यवहाराला चालना मिळेल आणि आर्थिक विकास होण्यास मदत होईल. २००३ मध्ये या पुलाची संकल्पना समोर आली. त्यानंतर प्रत्यक्षात २००९ मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात केली गेली. आता तो सामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलासाठी १७.३ अब्ज डॉलर इतका खर्च आला आहे. याच्या बांधणीचा खर्च हाँगकाँग, झुहाई आणि मकाऊ या तिन्हीच्या सरकारने मिळून केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 5:09 pm

Web Title: china launches the worlds longest sea bridge this mega bridge links hong kong to the mainland
Next Stories
1 VIDEO: जेव्हा काँग्रेसचा आमदारच म्हणतो, ‘पक्ष गेला तेल लावत’
2 ‘ह्युंदाई’ची नवी Santro आज होणार लॉन्च
3 धाकड गर्ल बबिता म्हणते; हॅलो फ्रेंडस, दूध पी लो
Just Now!
X