दहशतवादाशी संबंध असल्याच्या संशयावरून पकडण्यात आलेल्या ४६ वर्षे वयाच्या राजीवमोहन कुलश्रेष्ठ या भारतीयास सोडून देण्यात आले असून भारतात पाठवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण आफ्रिकेतील ‘गिफ्ट ऑफ द गिव्हर्स’ या धर्मादाय संस्थेच्या वतीने कुलश्रेष्ठ व इतर १९ परदेशी नागरिक पर्यटनास निघाले असता त्यांना चीनच्या अंतर्गत मंगोलिया प्रांतात १० जुलैला ताब्यात घेण्यात आले. प्रतिबंधित दहशतवादी गटांनी तयार केलेल्या दृश्यफिती ते पाहत होते, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. कुलश्रेष्ठ हे दिल्लीचे उद्योगपती असून त्यांना काल सायंकाळी भारतात आणण्यात आले व नंतर भारतात जाऊ देण्यात आले. त्यांच्या सुटकेसाठी भारतीय दूतावासाने चिनी दूतावासाशी संपर्क साधला.