15 December 2019

News Flash

चीनची बॉम्बर विमाने अमेरिकी तळांवर हल्ला करणार का ?

चीनकडून लष्करी हालचाली सुरु असून ते अमेरिकेच्या तळांवर हल्ला करु शकतात असे संरक्षण संस्था पेंटागॉनने म्हटले आहे. पेंटागॉन ही अमेरिकेची सर्वोच्च संरक्षण संस्था आहे.

चीनकडून लष्करी हालचाली सुरु असून ते अमेरिकेच्या तळांवर हल्ला करु शकतात असे संरक्षण संस्था पेंटागॉनने म्हटले आहे. पेंटागॉन ही अमेरिकेची सर्वोच्च संरक्षण संस्था आहे. चीनची बॉम्बर विमाने आमच्या तळांवर हल्ला करु शकतात असे पेंटागॉनने आपल्या अहवालात म्हटले आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सध्या व्यापार युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये यावरुन तणाव वाढलेला असताना पेंटागॉनचा हा अहवाल समोर आला आहे.

२०१७ साली चीनने संरक्षणावर १९० अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च केला असण्याची शक्यता आहे असे पेंटागॉनने आपल्या अहवालात म्हटले आहे. सध्या सुरु असलेल्या व्यापार युद्धावर अमेरिका आणि चीनमध्ये लवकरच चर्चा होण्याची शक्यता असताना हा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे संभाव्य बोलणी फिस्कटू शकतात.

चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेतील चिनी दूतावासाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. यावर्षी चिनी हवाई दलाची बॉम्बर विमाने दक्षिण चीन सागरातील चीनच्या ताब्यात असलेल्या बेटांवर तैनात करण्यात आली आहेत. दक्षिण चीन सागरातील वादग्रस्त प्रदेशात युद्ध सरावासाठी ही विमाने पाठवण्यात आली आहेत.

जून महिन्यात अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटीस यांनी चीनचा दौरा केला. २०१४ नंतर चीन दौऱ्यावर जाणारे ते पेंटागॉनचे पहिले प्रमुख होते. चीनची आर्थिक विकासाची गती मंदावली असली तरी २०२८ पर्यंत चीनचे संरक्षण बजेट २४० अब्ज डॉलरपेक्षा जास्त असू शकते असे पेंटागॉनच्या अहवालात म्हटले आहे.

First Published on August 17, 2018 6:50 pm

Web Title: china military likely training for strikes on us
टॅग China
Just Now!
X