अमेरिकेच्या तज्ज्ञांचे मत

पाकिस्तान आणि चीन यांच्यातील आघाडी ही मुख्यत्वे त्या देशांच्या भारताशी असलेल्या वैमनस्यातून झालेली असल्याचे मत अमेरिकेतील तज्ज्ञांनी म्हटले आहे. यापैकी एका तज्ज्ञाने भारत-चीन सीमेवरील तणावाबाबत चिंताही व्यक्त केली आहे.

चीन आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या निकटच्या संबंधांमुळे उपखंडात तणाव वाढत आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध नैसर्गिक स्वरूपाचे असून ते दोन्ही देशांचे भारताशी असलेल्या वैमनस्यातून निर्माण झालेले आहेत, असे अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा आयोगाचे आयुक्त कॅथरिन टॉबिन यांनी म्हटले आहे.

भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या संदर्भात हात बंद असे सध्या अमेरिकेचे धोरण आहे, असे हेरिटेज फाऊण्डेशनच्या लिसा कर्टिस यांनी म्हटले आहे. चीनमधील पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक लडाखमध्ये गेल्यानंतर तणावाची स्थिती असल्याचे निदर्शनास आले होते, असेही कर्टिस म्हणाल्या. याबाबतच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे, मात्र अमेरिकेने त्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे, असे आपण म्हणणार नाही, परंतु सीमेवर तणाव निर्माण झालाच तर अमेरिकेने त्याला कसा प्रतिसाद द्यावा त्याची कल्पना करून ठेवली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.