चीनने ‘चांग-५’ ही चांद्रमोहीम आखली असून लवकरच या मोहिमेद्वारे चीनच्या अवकाश संशोधन केंद्राचे अवकाशयान चंद्रावर जाणार आहे. विशेष म्हणजे हे यान चंद्रावर जाऊन परत पृथ्वीवर परतणार आहे.
चंद्रावर जाण्याचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. झचँग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून हे यान सोडण्यात येणार असून शुक्रवारी या चांद्रमोहिमेला सुरुवात होणार आहे.
ही संपूर्ण मोहीम आठ दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती चीन सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने दिली.
चंद्रावर अशा प्रकारचे यान पाठविण्याची चीनची ही पहिलीच वेळ असून, तब्बल ३,८०,००० किलोमीटरचा प्रवास करून हे यान परतणार आहे.