चीनच्या वुहानमधून उगम पावलेल्या करोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीनमधील नानजिंग शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. सोमवारी ७६ नवे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जानेवारीनंतर नोंद झालेली सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने या भागात चाचण्या करण्यावर भर दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागच्या आठवड्यात नानजिंग विमानतळावर १७ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नानजिंक लोकोउ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ५२१ आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली होती. तसेच व्यापक स्वरुपात करोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. करोनाचा धोका पाहता हजारो लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी केली जात असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. करोना रुग्ण आढळल्याने चीनमध्ये पु्न्हा करोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे.

चीनमध्ये आतापर्यंत ९२ हजार ६०५ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुलांना व्हॅक्सिन घेतल्याशिवाय शाळेत पाठवण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण कुटुंबाचं करोना लसीकरण करण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर लसीकरणाशिवाय रुग्णालय आणि बाजारात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China reports 76 new coronavirus cases the highest daily rise since january rmt
First published on: 26-07-2021 at 14:42 IST