News Flash

चीनचं ‘ते’ सर्वात मोठं रॉकेट भारताच्या टप्प्यात; हिंद महासागरात कोसळले अवशेष

पृथ्वीच्या वातावरणाच्या संपर्कात आल्यावर या रॉकेटचे बरेचसे अवशेष जळून खाक झाल्याची माहिती

फोटो सौजन्य : (China Daily via REUTERS)

चीनच्या सर्वात मोठ्या रॉकेटचे अवशेष रविवारी हिंद महासागरात पडले असून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्या रॉकेटचे बरेचसे भाग नष्ट झाल्याचं वृत्त चीनी माध्यमांकडून देण्यात आलं आहे. हे अवशेष कुठे पडतील याचं अनुमान बांधण्याचे दिवस संपल्याचं आता सांगण्यात येत आहे. चीनच्या अंतराळ अभियांत्रिकी कार्यालयाच्या मदतीने चीनच्या माध्यमांनी मालदीव बेटांच्या पश्चिमेला या अवशेषांमुळे महासागरात होणाऱ्या परिणामाबद्दल माहिती दिली आहे.

२९ एप्रिल रोजी या लाँग मार्च 5B रॉकेटचा स्फोट झाल्यानंतर काही लोकांनी या अवशेषांना आाकाशातून पडताना पुसटसं पाहिल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, चीनच्या अंतराळ अभियांत्रिकी कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीच्या वातावरणाच्या संपर्कात आल्यावर या रॉकेटचे बरेचसे अवशेष जळून खाक झाले आहेत. चीनच्या माध्यमांच्या म्हणण्यानुसार, या रॉकेटने सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला.

अमेरिकेच्या अंतराळ संस्थेकडून हे अवशेष पेनिन्सुलामध्ये सापडल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र, या अवशेषांमुळे जर जमीन किंवा पाण्यावर काही परिणाम झाला तर हे अवशेष अज्ञात असणार आहेत.

मे २०२० मधल्या पहिल्या उड्डाणानंतर 5B या प्रकारातलं लाँग मार्च हे दुसरं उड्डाण आहे. गेल्या वर्षी पहिल्या लाँग मार्च 5Bचे अवशेष कोसळल्याने काही इमारतींचं नुकसान झालं होतं. मात्र, कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झाली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 11:10 am

Web Title: china says rocket debris landed in indian ocean west of maldives vsk 98
Next Stories
1 करोनाचा प्रकोप : देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक बळी
2 ‘डोनाल्ड ट्रम्प’, ‘अमिताभ बच्चन’ यांच्या नावेही ई-पाससाठी नोंदणी! प्रशासनही चक्रावले!
3 “झोपेतून जागे व्हा आणि करोना काळात येणाऱ्या समस्यांचा सामना करा”
Just Now!
X