भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारावेत, यासाठी आम्हाला काश्मीरप्रश्नी दोन्ही देशांमध्ये समेट घडवून आणायचा आहे, अशी इच्छा चीनकडून व्यक्त करण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुआंग यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांमध्ये नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे संपूर्ण जगाचे लक्ष काश्मीरकडे वेधले गेले आहे. भारत व पाकिस्तान  हे दक्षिण आशियाई परिसरातील महत्त्वाचे देश आहेत. त्यामुळे काश्मीरमधील परिस्थितीवरून जागतिक समुदायाचे नेहमीच त्यांच्याकडे लक्ष लागलेले असते. त्यामुळे भविष्यात दोन्ही देश काश्मीरमध्ये शांतता व स्थैर्य राखण्यासाठी प्रयत्न करतील, अशी आम्हाला आशा आहे. या सगळ्यात चीनला सकारात्मक भूमिका बजावायची आहे, असेही जेंग शुआंग यांनी सांगितले.

…मग केंद्र सरकारचे तीन मंत्री चीनमध्ये पाहुणचार का झोडत होते? : राहुल गांधी

काही दिवसांपूर्वीच चीनने भारताला काश्मीरमध्ये सैन्य घुसवण्याची धमकी दिली होती. भारतीय सैन्य जर भूतानच्या मदतीसाठी डोक्लाममधील रस्त्याच्या बांधकामात बाधा आणत असेल, तर त्याच तर्काच्या आधारे काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या विनंतीवरुन ‘तिसऱ्या देशाचे’ सैन्य प्रवेश करु शकते, असे चीनने म्हटले होते. चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामधून ही उघड धमकी देण्यात आली होती. डोक्लाम भागात चीन आणि भारताच्या India china सैन्यामध्ये गेल्या तीन आठवड्यांमध्ये खडाजंगी सुरु आहे. या कालावधीत चीनच्या सरकारी वृत्तपत्रांनी अनेकदा चिथावणीखोर भाषेचा वापर करत तणाव वाढवला आहे. मात्र आता प्रथमच चीनकडून या वादात ‘काश्मीर’ आणि ‘पाकिस्तान’चा उल्लेख करण्यात आला आहे. भारताने सिक्किममधील हालचाली थांबवल्या नाहीत, तर थेट काश्मीरमध्ये प्रवेश करु, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. भूतानला मदत करण्याच्या नावाखाली चीनकडून डोक्लाममध्ये घुसखोरी करण्यात आली आहे. भूतानला मदत करण्याच्या बहाण्याने भारताकडून घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत,’ असे ग्लोबल टाईम्सने लेखात म्हटले होते.

‘चीनला धोबीपछाड देऊन भारतीय अर्थव्यवस्था जगाच्या विकासाचे केंद्र’