29 May 2020

News Flash

भारतासाठी धोक्याची घंटा! चीनने पाकिस्तानला दिली शक्तिशाली मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम

लष्करी संबंधही अधिक दुढ करत चालले आहेत.

पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी मदत दिवसेंदिवस कमी होत आहे. अशातच पाकिस्तानने भारताला समोर ठेवून आपल्या संरक्षण अंदाजपत्रकात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताला घेरण्यासाठी चीन आणि पाकिस्तान आर्थिक संबंधांबरोबरच आता लष्करी संबंधही अधिक दुढ करत चालले आहेत. चीनने पाकिस्तानला शक्तिशाली मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम दिल्याची माहिती आहे. या सिस्टिममुळे पाकिस्तानच्या मल्टी वॉरहेड मिसाइल कार्यक्रमाला गती मिळणार आहे. हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट न्यूजपेपरने हे वृत्त दिले आहे. ही मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम विकत घेण्यासाठी पाकिस्तानने नेमकी किती रक्कम मोजली ते समजू शकलेले नाही.

नवीन मिसाइल विकसित करण्यासाठी आणि विविध चाचण्यांसाठी पाकिस्तानने फायरिंग रेंजवर या मिसाइल सिस्टिमचा वापर सुरु केला आहे. चायनीस विज्ञान प्रबोधिनीच्या संशोधकाने वृत्तपत्राला ही माहिती दिली. पाकिस्तानने चीनकडून ही अत्याधुनिक मिसाइल प्रणाली विकत घेतली आहे असे सिचुआन प्रांतातील विज्ञान प्रबोधिनितील हेंग मेंगवी यांनी सांगितले.

भारताने गुरुवारी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची बातमी आल्यानंतर चीनने पाकिस्तानला ही मिसाइल सिस्टिम विकल्याची माहिती समोर आली. साधारणत: मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिममध्ये दोन दुर्बीणी असतात चीनच्या या सिस्टिममध्ये चार दुर्बीणी आहेत. जास्त दुर्बीणस अल्यामुळे एकाचवेळी वेगवेगळया दिशेने येणाऱ्या मिसाइलसवर लक्ष ठेवता येते. त्यामुळे शत्रूने डागलेल्या मिसाइलसकडून लक्ष्यभेद होण्याचा धोका कमी होतो.

आम्ही त्यांना नेत्र दिले आहेत. चंद्रासह त्यांना जे काय पाहायचे आहे त्यासाठी ते त्यांचा वापर करु शकतात असे चीनच्या संशोधकाने म्हटले आहे. यापूर्वी चीनने पाकिस्तानला लढाऊ विमाने, युद्धा नौका, पाणबुडया, ड्रोन विमाने दिली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2018 6:48 pm

Web Title: china sells pakistan missile tracking system
टॅग China,Pakistan
Next Stories
1 तो हार्दिक पांड्या नव्हेच! आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह ट्विट प्रकरणात नवी माहिती
2 प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युईटी संदर्भात Good News
3 व्होडाफोन ५० लाख लोकांना देणार जॉब ट्रेनिंग
Just Now!
X