20 September 2020

News Flash

हाँगकाँगवरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला इशारा

चीन आता राष्ट्रीय सुरक्षा विधेयकाद्वारे हाँगकाँगसाठी नवा कायदा आणण्याची तयारी करत आहे.

मागच्यावर्षी लोकशाही हक्कांसाठी हाँगकाँगमध्ये मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतर चीन आता राष्ट्रीय सुरक्षा विधेयकाद्वारे हाँगकाँगसाठी नवा कायदा आणण्याची तयारी करत आहे. हा प्रस्तावित कायदा प्रत्यक्षात येण्याआधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

हाँगकाँगवर अधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिकेकडून अत्यंत कठोर प्रतिक्रिया उमटू शकते असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. हाँगकाँगची स्वायत्तता आणि मानवी हक्कांचा आदर राखणे अत्यंत महत्वाचे आहे असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हाँगकाँग हे जगातील महत्वाचे वित्तीय केंद्र आहे. हाँगकाँग १९९७ पासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे. चीनच्या तुलनेत हाँगकाँगमध्ये अनेक सवलती आहेत. तिथली जनता लोकशाही हक्कांसाठी जागरुक आहे. त्यामुळे चीनचे सर्व कायदे हाँगकाँगमध्ये लागू होत नाहीत. मागच्यावर्षी लोकशाही हक्कांसाठी हाँगकाँगमध्ये हिंसक आंदोलन झाले होते.

आणखी वाचा- देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी सर्व काही करु, भारताचा चीनला सूचक इशारा

आता सुद्धा चीनने इथे कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केल्यास हिंसक आंदोलनाचा वणवा पेट घेऊ शकतो. करोना व्हायरसमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या चीनला आपला नंबर १ शत्रू बनवले आहे. करोना व्हायरस चीनमुळेच जगभरात पसरला. त्यामुळे ट्रम्प सातत्याने चीनला लक्ष्य करत आहेत. नोव्हेंबरमध्ये अमेरिेकेत राष्ट्राध्यक्षीय निवडणूक होणार आहे. त्याआधी प्रत्येक आघाडीवर चीनची कोंडी करण्याची ट्रम्प यांची रणनिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 9:56 am

Web Title: china set to impose new hong kong security law trump warns of strong us reaction dmp 82
Next Stories
1 देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी सर्व काही करु, भारताचा चीनला सूचक इशारा
2 विकृत, दफन केलेला मुलीचा मृतदेह बाहेर काढून शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न
3 दिल्लीकरांनी वेग पकडला!
Just Now!
X