News Flash

भारताला कोणीही धमकावण्याचा प्रयत्न करू नये- राजनाथ सिंह

अरूणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन सीमेवर दोन हजार किलोमीटर रस्ते बांधण्याच्या योजनेबद्दल चीनकडून करण्यात आलेल्या नापसंतीदर्शक वक्तव्यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरूवारी प्रत्युत्तर दिले.

| October 16, 2014 05:34 am

अरूणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन सीमेवर दोन हजार किलोमीटर रस्ते बांधण्याच्या योजनेबद्दल चीनकडून करण्यात आलेल्या नापसंतीदर्शक वक्तव्यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरूवारी प्रत्युत्तर दिले. सद्यस्थितीत भारत एक शक्तिशाली देश आहे. त्यामुळे  भारताला कोणीही धमकावू शकत नाही, अशा शब्दांत राजनाथसिंह यांनी अप्रत्यक्षपणे चीनला इशारा दिला. सीमाप्रश्न सोडवायचा असेल तर, भारत-चीन एकत्र बसून चर्चा करावी, असे त्यांनी यावेळी सुचवले. चीनने यापूर्वीच त्यांच्या प्रदेशात रस्त्यांचे आणि रेल्वेमार्गाचे जाळे पसरवले आहे. तेव्हा आम्ही आमच्या हद्दीमध्ये काय करतो, याची चीनने चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
चीन आणि भारत यांच्या पूर्वेकडील सीमांविषयी वाद आहेत. याविषयी तोडगा निघण्यापूर्वीच भारताकडून कोणतेही पाऊल उचलले जाऊ नये, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते होंग लेई यांनी बुधवारी सांगितले होते…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 5:34 am

Web Title: china should sit with us to solve the border issue no one can warn india says rajnath on arunachal road plan 2
टॅग : China
Next Stories
1 पंतप्रधानांकडून केंद्रीय अर्थसचिव अरविंद मायाराम यांची बदली
2 चीनची आदळआपट
3 रिचर्ड फ्लॅनेगन यांना बुकर
Just Now!
X