30 September 2020

News Flash

‘काश्मीरातील कारवाया चीनने थांबवाव्यात’

पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनची उपस्थिती असून त्यावर भारताचे बारकाईने लक्ष आहे आणि चीनने अशा प्रकारच्या कारवाया थांबवाव्या असे त्यांना सांगण्यात आले आहे

| July 26, 2014 01:00 am

पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनची उपस्थिती असून त्यावर भारताचे बारकाईने लक्ष आहे आणि चीनने अशा प्रकारच्या कारवाया थांबवाव्या असे त्यांना सांगण्यात आले आहे, असे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या चीनच्या कारवायांवर सरकारचे लक्ष आहे, त्याबाबत भारताने चीनला कळविले असून अशा प्रकारच्या कारवाया खंडित कराव्या, असेही त्यांना सांगण्यात आल्याचे जेटली म्हणाले.
चीनच्या अधिकाऱ्यांसमवेत विविध प्रश्नांवर म्हणजेच दोन्ही देशांमधील संबंध, प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांवर नियमितपणे चर्चा सुरू आहे. चीनच्या लष्कराचे वास्तव्य या प्रश्नावरही चर्चा झाली असून तेथे त्यांच्याकडून सुरू असलेल्या बांधकामांबाबतचा प्रश्नही चर्चिला गेला आहे, असेही जेटली म्हणाले. दोन्ही देशांमध्ये मध्यंतरी झालेल्या भेटीत समन्वय आणि सलोखा यांना प्राधान्य दिले जाईल, असे ठरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 1:00 am

Web Title: china should stop actions in kashmir
टॅग China,Kashmir
Next Stories
1 महाराष्ट्र सदनाच्या अनागोंदीप्रकरणी शिवसेनेचा मलिक यांच्या विरोधात हक्कभंग
2 उत्तर प्रदेशात हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, सात ठार
3 अल्जेरियाचे विमान कोसळून ११६ ठार
Just Now!
X