21 September 2020

News Flash

चीन नमलं, जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचं केलं मान्य

तीन दिवसांच्या बीआरआय समिटमध्ये चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने हे नकाशे प्रदर्शित केले

अरुणाचल प्रदेश आपला आहे असा दावा करणाऱ्या चीनने अखेर आपली चूक सुधारली असून जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचं मान्य करत नमती भूमिका घेतली आहे. बीजिंग येथे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह समिट सुरु असून यावेळी चीनने बीआरआय मार्गांचे नकाशे दाखवले. आश्चर्यकारकरित्या या नकाशांमध्ये जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा भाग दाखवण्यता आले आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, भारताने सलग दुसऱ्यांना परिषदेवर बहिष्कार टाकूनही नकाशात भारत बीआरआयचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तीन दिवसांच्या बीआरआय समिटमध्ये चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने हे नकाशे प्रदर्शित केले. चीनने जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचं अविभाज्य भाग दाखवणं तसं भारतासाठी आश्चर्यकारकच असून विरोधाभास निर्माण करणारं आहे.

चीनने याआधी अरुणाचल भारताचा अविभाज्य भाग दाखवणारे अनेक नकाशे नष्ट केले होते. हा चीनचा भाग असल्याचा दावा वारंवार चीनने केला असून भारतीय नेत्यांनी केलेल्या दौऱ्यांचाही निषेध केला आहे. याआधी चीनने त्यांच्या नकाशात जम्मू काश्मीर हा पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा भाग असल्याचा दावा अनेकदा केला होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने जाणुनबुजून आखलेली ही रणनीती असण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात चीनमधील चॅनेल सीजीटीएऩ टेलिव्हिजनने कराचीमधील चिनी दुतावासावर झालेल्या हल्ल्याचं वृत्त देताना पाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीरही वेगळं दाखवलं होतं.

पाकिस्तानच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीर वेगळं दाखवण्याचा परिणाम चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कोरिडोअरवर (सीपीईसी) होण्याची शक्यता आहे. सीपीईसी पाकव्याप्त काश्मीरमधून जात असल्याने भारताने त्याचा विरोध केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 12:55 pm

Web Title: china shows jammu kashmir and pakistan as part of china in map bri summit
Next Stories
1 वाराणसीत शक्तिप्रदर्शन करत नरेंद्र मोदींकडून उमेदवारी अर्ज दाखल
2 CRPF, BSF, NSG होणार हायटेक; ताफ्यात दाखल होणार अत्याधुनिक गाड्या
3 वाराणसीत शंभराहून अधिक जवान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करणार
Just Now!
X