News Flash

विषाणूच्या उत्पत्तीबाबत पुर्नविचार करण्याचे डब्ल्यूएचओच्या प्रमुखांचे मत; चीनवर दबाव

चीनकडून अपूर्ण माहिती मिळाल्याचा अमेरिकेचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

कोविड -१९ च्या उत्पत्तीच्या तपासणीबद्दल चायनाला बुधवारी वाढत्या दबावाचा सामना करावा लागला, करोनाव्हायरस हा विषाणू चीनी प्रयोगशाळेतून गळती झाल्याच्या सिद्धांताचा डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी पुर्नविचार करण्याच्या वक्तव्यामुळे तसेच चीनकडून अपूर्ण माहिती मिळाल्याच्या अमेरिकेच्या दाव्यामुळे चीन पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

मंगळवारी डब्ल्यूएचओ आणि चीनी तज्ज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात कोविड -१९ च्या विषाणूच्या प्रसारामागे वेगळाच प्राणी असल्याची नोंद केली होती. ज्यामुळे वटवाघूळांपासून मनुष्याकडे हा विषाणू पसरला. चीनने या अहवालाचे जोरदार स्वागत केले होते.

चीनच्या मध्यवर्ती शहर वुहानमधील व्हायरलॉजीच्या प्रयोगशाळेतून हा विषाणू प्रथम उद्भवला आणि या विषाणूमुळे कोविड -१९ हा साथीचा रोग निर्माण झाला असावा या सिद्धांतास चीनने ठामपणे नकार दर्शविला असल्याचे या अहवालात सुरुवातीला म्हटले आहे.

परंतु डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेबेरयसियस यांनी मंगळवारी विषाणूची उत्पत्ती प्रयोगशाळेतील झाली असल्याच्या शक्यतेचा पुर्नविचार करण्याचे वक्तव्य केले, कारण जानेवारीत वुहानच्या दौऱ्यात चीनने तज्ञांना प्रवेश न देण्यासाठी कारणे दिली होती. त्यांनी भविष्यातील चौकशीमध्ये “वेळेवर आणि सर्वसमावेशक डेटा सामायिकरण” करण्याची मागणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 2:32 pm

Web Title: china under pressure after who chief revives lab leak theory behind the origin of coronavirus sbi 84
Next Stories
1 इशरत जहाँ बनावट चकमक : तीन पोलीस अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता
2 Aadhaar PAN Linking: ‘सरकारने आधी आयकर विभागाची वेबसाईट नीट चालवावी’; साईट क्रॅश झाल्याने सर्वसामान्य संतापले
3 आणखी ३ राफेल लढाऊ विमाने आज भारतात होणार दाखल
Just Now!
X