सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करण्यास बंदी घालणारा आदेश शिकियांगच्या युघीर प्रांतातील सरकारने काढला आहे. याविरोधात मतदान घेण्यात आल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली. चीन सरकारने या विरोधातील असंतोष दडपण्यासाठी कठोर कारवाई हाती घेतली आहे, तर काहींनी चीन याबाबत सापत्न वागणूक देत असल्याची टीका केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम चीनमधील मागास भागांत झालेल्या वांशिक संघर्षांत शंभरहून अधिक लोक मारले गेले आहेत. सरकारनेही याविरोधात आणखी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. युरुम्कीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या गटाने सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करण्यास बंदी घालणाऱ्या नियमांचा विचार करून ते स्वीकारण्यात येत असल्याचे ‘सिना’ संकेतस्थळावरील बातमीत स्पष्ट करण्यात आले आहे.