चिनी-फ्रेंच वंशाचे चित्रकार झाओ वॉउ की (वय ९३) यांचे स्वित्र्झलड येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. विसाव्या शतकात चीनच्या कलाजगतात त्यांचा विशेष दबदबा होता. अमूर्त चित्रशैलीसाठी ते प्रसिद्ध होते.
झाओ यांना एक मुलगा असून त्याचे सावत्र आईशी मालमत्तेवरून भांडण आहे. त्याची कायदेशीर लढाई त्या दोघात चालू आहे. झाओ यांच्या मुलाच्या वकिलाने झाओ यांचा स्मृतिभ्रंश म्हणजे अल्झायमरने मृत्यू झाल्याचे सांगितले. मार्चअखेरीस त्यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बीजिंग येथे जन्मलेले झाओ यांनी त्यांच्या देशात कम्युनिस्ट पक्षाची सत्ता येण्याच्या अगोदर फ्रान्समध्ये स्थलांतर केले. १९६४ पासून ते फ्रान्सचे नागरिक होते. त्यांच्या चित्रकृतींना लिलावात १० लाख ते २५ लाख अमेरिकी डॉलर इतकी किंमत मिळत असे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव जिया लिंग झाओ असे होते, दुसरी पत्नी फ्रँकाइस माक्र्वेट व जिया यांचा मुलगा यांच्यात मालमत्तेवरून वाद होते. माक्र्वेट या पॅरिसमधील मॉडर्न आर्ट म्युझियमच्या क्युरेटर होत्या व त्या झाओ यांच्यासमवेत २०११मध्ये स्वित्र्झलडला आल्या होत्या.