चीनमध्ये धक्कादायक घटनेत एका जोडप्याने आयफोन विकत घेण्यासाठी आपल्या १८ महिन्यांच्या मुलीला विकल्याचे उघड झाले आहे. ३५३० अमेरिकी डॉलर्स किंमत असलेला आयफोन त्यांना विकत घेण्याचा त्यांचा इरादा होता. आग्नेय चीनमध्ये फुजियन प्रांतात वडिलांनी या मुलीला विकण्यासाठी गिऱ्हाईक शोधले, त्यासाठी त्यांनी क्यूक्यू या समाजमाध्यम संकेतस्थळाची मदत घेतली. संबंधिताने त्यांना २३ हजार युआन म्हणजे ३५३० डॉलर्स दिले आहेत. असे पीपल्स डेलीने म्हटले आहे. संबंधित व्यक्तीने आयफोन व मोटारबाईक विकत घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे समजते. या मुलीची आई शियाओ मेई हिने अनेक अंशवेळ नोकऱ्या केल्या आहेत, तर वडिलांनी काहीच पैसा न कमावता इंटरनेट कॅफेत बसून पैसा घालवला आहे. या जोडप्याने २०१३ मध्ये त्यांची भेट झाल्यानंतर विवाह करण्याचे ठरवले होते, पण कायदेशीरदृष्टय़ा ते विवाहाच्या वयाचे नव्हते. त्यानंतर त्यांचा विवाह झाला. मूलही झाले. दोघा मातापित्यांचे वय १९ वर्षे आहे. त्यांच्याकडे पैसा नव्हता, त्यामुळे नवजात कन्या हेही ओझे बनले होते व त्यामुळे वडील डय़ुआन याने मुलीला विकले. नंतर मेई पळून टोंगान येथून पळून गेली, पण तिला पोलिसांनी शोधले. तिने सांगितले, की मला आईवडिलांनी दत्तक घेतले होते व सर्वच भावंडांना वाढवण्यासाठी इतरांना दिले होते, त्यामुळे मूल विकणे हा गुन्हा आहे असे वाटले नाही. मेई गीला अडीच वर्षे तर डय़ुआन याला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. संबंधित व्यक्तीने बहिणीसाठी मुलगी विकत घेतली व ती आता तिच्याकडेच आहे.