25 November 2020

News Flash

…म्हणूनच नियंत्रण रेषेवरुन भारतासोबत वाद, चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं कारण

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतावर फोडलं खापर

संग्रहित (REUTERS/Hannibal Hanschke)

भारत आणि चीनने आपल्यामधील मतभेदांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे तसंच त्याचं वादात रुपांत होऊ देता कामा नये असं चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी म्हटलं आहे. वादग्रस्त सीमारेषेवर स्थिरता राखण्यासाटी आपण बांधील असल्याचंही ते म्हणाले आहेत. पॅरिसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना वँग यी यांनी हे मत व्यक्त केल्याचं ग्लोबल टाइम्सने म्हटलं आहे. चीन चर्चेच्या माध्यमातून भारतासोबत वाद मिटवण्यास इच्छुक असल्याचं सांगताना वँग यी यांनी सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावासाठी भारतालाच जबाबदार ठरवलं.

दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या समस्या द्विपक्षीय संबंधांदरम्यान योग्य ठिकाणी ठेवल्या गेल्या पाहिजेत असंही ते म्हणाले आहेत. वँग यी पाच देशांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. फ्रान्स आणि जर्मनीलाही यावेळी त्यांनी भेट दिली असून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चीन-भारत संबंधांवरही भाष्य केलं.

“चीन-भारत संबंधांनी गेल्या काही काळात सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की, नियंत्रण रेषा परिसरात स्थिरता राखण्यासाठी चीन नेहमीच कटिबद्द आहे,” असं त्यांनी यावेळी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “परिस्थिती अजून बिघडेल असं कोणतंही पाऊल चीन उचलणार नाही. हो पण आम्ही आमच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचेही रक्षण केलं पाहिजे”.

“चीन आणि भारत यांच्यातील सीमा निश्चित केली गेली नाही, त्यामुळे नेहमीच या प्रकारच्या समस्या येतील. भारतासोबत चर्चा करुन समस्यांवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचवेळी द्विपक्षीय संबंधांचा प्रश्न येतो तेव्हा या समस्या योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत,” असं मत वँग यी यांनी व्यक्त केलं आहे.

वँग यी यांनी यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकींचा उल्लेख केला. “उदाहरणार्थ ड्रॅगन आणि हत्ती भांडण्यापेक्षा ते एकत्र नाचले तर…१ अधिक १ २ नसून ११ आहेत तसंच,” असं ते म्हणाले. “अजून एक उदाहरण म्हणजे दोन्ही देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी एकमेकांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं असून ही बाजू वादापेक्षा मोठी आहे. सामान्य हितसंबंध विरोधाभासांपेक्षा जास्त असतात. मतभिन्नतेवर नियंत्रण असलं पाहिजे, त्यांचं रुपांतर वादात होऊ देता कामा नये,” असं वँग यी यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 10:37 am

Web Title: chinese foreign minister wang yi on lac row with india sgy 87
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मान्यवरांनी घेतलं प्रणव मुखर्जींचं अंत्यदर्शन
2 सरकारी वृत्तवाहिनीच्या ऑस्ट्रेलियन महिला अँकरला चीनकडून अटक; हेरगिरीचा संशय
3 भीम आर्मी, रवीश कुमार यांचं समर्थन करणारी १४ पेजेस बंद; भाजपाच्या तक्रारीनंतर फेसबुकची कारवाई
Just Now!
X