गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमरिका यांच्यातील तणाव वाढत आहे. अमेरिकेनंदेखील चीनवर काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेतसा आहे. तर चिनी कंपन्यांच्या काही अ‍ॅपवरही बंदी घालण्याचा अमेरिकेचा विचार आहे. यावरून शुक्रवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी अमेरिकेला इशारा दिला. जर वी-चॅटवर अमेरिकेनं बंदी घातली तर चीनचे नागरिक अ‍ॅपल कंपनीवर बहिष्कार टाकतील, असं ते म्हणाले. अमेरिकेत वी-चॅटवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आहे आणि या पार्श्वभूमीवर ते अ‍ॅप बॅन करण्याचाही विचार सुरू आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वी-चॅट आणि टिक टॉकवर बंदी घातली जाणार असल्याचं म्हटलं होतं. सप्टेंबर महिन्यात या दोन्ही अ‍ॅपवर अमेरिकेत बंदी घातली जाऊ शकते. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव यावर बंदी घालण्यात येणार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते. त्यानंतर अमेरिका आणि चीनमधील तणावर अधिक वाढला होता.

आणखी वाचा- अमेरिकेत चिनी संशोधकाला अटक; गुप्त माहिती चोरल्याचा आरोप

“जर अमेरिकेनं वी-चॅटवर बंदी घातली तर चीनमधील नागरिकदेखील आयफोन आणि अ‍ॅपलच्या अन्य प्रोडक्ट्सवर बहिष्कार टाकतील. जर अमेरिकेनं वी-चॅटवर बंदी घातली तर आयफोनचा वापर आम्ही बंद करू असं चीनमधील नागरिक म्हणत आहेत,” असं मत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी शुक्रवारी व्यक्त केलं.

आणखी वाचा- चीनला वठणीवर आणण्यासाठी मोदी सरकार आणखी एक दणका देण्याच्या तयारीत

भारतातही टिकटॉक अ‍ॅप प्रचंड लोकप्रिय होते. पण गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर भारत सरकारने देशात व्यवसाय करणाऱ्या चिनी कंपन्यांना जोरदार दणका दिला. यामध्ये टिकटॉकसह काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. भारताने टिकटॉकवर बंदीची कारवाई केल्यानंतर अमेरिकेतही प्रतिनिधी सभागृहाच्या काही सदस्यांनी टिकटॉकवर अशीच कारवाई करण्याची मागणी केली होती.