चीन सरकारची कारवाई

स्पर्धात्मकता नियमांचा भंग केल्याप्रकरणी चीनमधील अलिबाबा समूहाला चीनच्या नियामक संस्थेने १८.३ अब्ज युआन म्हणजे २.८ अब्ज डॉलर्सचा दंड केला आहे. अलीबाबा समूह हा ई व्यापार क्षेत्रात काम करीत आहे.

सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञान उद्योगांना वेसण घालण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. अलीबाबासारख्या एकेकाळच्या बय़ा इंटरनेट व्यापार कंपन्या आर्थिक व आरोग्य क्षेत्रात विस्तार करीत असून संवेदनशील क्षेत्रातही येऊ पाहात आहेत. पक्षाने म्हटले आहे, की मक्तेदारी प्रतिबंधक कायद्यानुसार तंत्रज्ञान विषयक कंपन्यांना आधी लक्ष्य करण्यात येत आहे. अलिबाबा समूहाला वस्तूंचे मोफत वितरण करून नियमभंग केल्याबद्दल राज्य विपणन नियामक मंडळाने दोषी ठरवले आहे. अलिबाबा समूहाला केलेला दंड हा २०१९ मधील विक्रीच्या चार  टक्के आहे. २०१९ मध्ये त्यांची विक्री ४५५.७१२ अब्ज युआन होती.   टेनसेंट व वुई चॅट यांनाही मार्चमध्ये ५ लाख युआन दंड करण्यात आला. एकूण १२ कंपन्यांवर कारवाई करण्यात आली.

जॅक मा यांच्यावर खप्पामर्जी

या कारवाईने अलिबाबा समूहाला मोठा धक्का बसला असून या समूहाचे  संस्थापक असलेले जॅक मा यांना नोव्हेंबरमध्ये पहिला धक्का तेथील सरकारने दिला होता. त्यात अँट ग्रुप या जॅक मा यांच्या उद्योगाला शेअर बाजारातून निलंबित केले होते. जॅक मा हे चीनमधील एक श्रीमंत व्यक्ती असून ते नोव्हेंबरमध्ये नियामक मंडळाविरोधातील वक्तव्यानंतर काही काळ बेपत्ता झाले होते.