07 August 2020

News Flash

बॅकफूटवर गेलेल्या चीनने हॉटस्प्रिंग, गोग्रामध्ये पाडलं उभं केलेलं बांधकाम

माघार घेण्याच्या प्रक्रियेला वेग

सलग दुसऱ्यादिवशी पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग आणि गोग्रा भागातून चिनी सैन्य मागे हटले आहे. चिनी सैन्याने इथे उभारलेले तात्पुरते इन्फ्रास्ट्रक्चरही हटवले आहे. चिनी सैन्याच्या या माघारीच्या प्रक्रियेवर भारतीय सैन्याचे अत्यंत बारीक लक्ष आहे. मागच्या आठ आठडयापासून हॉट स्प्रिंग आणि गोग्रा भागात भारतीय आणि चिनी सैनिक आमने-सामने उभे ठाकले होते.

दोन्ही देशांमध्ये परस्पर सहमतीने तणाव कमी करण्याची जी प्रक्रिया ठरली आहे, त्यानुसार पुढच्या दोन दिवसात हॉट स्प्रिंग आणि गोग्रामध्ये सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. एनएसए अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यामध्ये रविवारी संध्याकाळी तब्बल दोन तास चर्चा झाली.

त्यानंतर सोमवारी सकाळी सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु झाली. सर्वप्रथम रक्तरंजित संघर्ष झालेल्या गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले. दोन्ही देशांमध्ये टप्याटप्याने वेगाने सैन्य मागे घेण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. सीमा वादावर चर्चेसाठी डोवाल आणि वँग हे विशेष प्रतिनिधी आहेत.

रात्रीच्या अंधारात भारत-चीन सीमेजवळ ‘मिग-२९’, ‘अपाचे’ची गर्जना
चिनी सैन्याने गलवान खोऱ्यातून माघार घेतली असली तरी भारताची तिन्ही सैन्य दलं प्रचंड सर्तक आहेत. याच सर्तकतेचा भाग म्हणून पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमारेषेजवळच्या फॉरवर्ड बेसवर भारताच्या फायटर विमानांनी सोमवारी रात्री कसून सराव केला. या सरावामध्ये मिग-२९ फायटर विमाने, अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्स सहभागी झाले होते.

चीनने कुठलीही आक्रमकता दाखवल्यास त्यांचा सामना करण्यासाठी तयारीचा भाग म्हणून रात्रीच्यावेळी हा सराव करण्यात आला असे इंडियन एअर फोर्सच्या अधिकाऱ्याने इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना सांगितले. गलवान खोऱ्यात संघर्ष झालेल्या पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळून चिनी सैन्य एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे फिरले आहे. पण परिस्थिती अजूनही पूर्णपणे सामान्य झालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 8:58 pm

Web Title: chinese military withdraws troops removes structures in hot springs gogra dmp 82
Next Stories
1 नेपाळमध्ये ओली सरकार वाचवण्यासाठी चीनचे उघडपणे जोरदार प्रयत्न
2 CBSE बोर्डाची यंदाच्या वर्षीच्या अभ्यासक्रमासंदर्भात महत्त्वाची घोषणा
3 विकास दुबेला चार पोलीस ठाण्यातील २०० पोलिसांकडून मदत?; एसटीएफकडून चौकशी सुरू
Just Now!
X