12 July 2020

News Flash

हिंदी महासागरात दिसल्या चिनी नौदलाच्या नौका

हिंदी महासागरात चिनी नौदलाच्या हालचाली दिसून आल्या आहेत.

हिंदी महासागरात चिनी नौदलाच्या हालचाली दिसून आल्या आहेत. गस्तीवर असणाऱ्या भारतीय नौदलाच्या विमानांना हिंदी महासागराच्या पश्चिमेकडच्या भागामध्ये चिनी नौदलाच्या जहाजांचा ताफा आढळला. अलीकडे हिंदी महासागरात चिनी नौदलाच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनच्या मासेमारी करणाऱ्या जहाजांच्या या ताफ्याला पीपल्स लिबरेशन आर्मीच्या नौदलाच्या ताफ्याने संरक्षण दिले होते. टाइम्स नाऊ वाहिनीने नौदलातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

मोरोक्कोच्या दिशेने ही जहाजे चालली होती. भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी अलीकडेच हिंदी महासागरात चिनी नौदलाचा वावर वाढल्याची कबुली दिली होती. हिंदी महासागरातील घडामोडींवर भारतीय नौदलाचे बारीक लक्ष असल्याचे नौदल प्रमुखांनी सांगितले होते.

मागच्या महिन्यात भारताच्या आर्थिक सागरी क्षेत्रात घुसखोरी करणाऱ्या चिनी जहाज भारतीय नौदलाकडून इशारा मिळाल्यानंतर माघारी फिरले होते. चिनी नौदल वेगाने विस्तार असल्याचीही भारताला पूर्ण कल्पना आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 1:51 pm

Web Title: chinese naval ships spotted in western indian ocean region dmp 82
Next Stories
1 लष्कर ए तोयबाचा दहशतवादी पकडला
2 “शाहीन बागच्या आंदोलनात सहभागी हो आणि बिर्याणी खा”; केरळच्या बेरोजगार तरुणाला आला ई-मेल
3 भारतीय हद्दीत घुसखोरी करणारे पाकिस्तानी ड्रोन बीएसएफने पाडले
Just Now!
X