चीनच्या पोलिसांनी दोन महिलांसह ९२ अपहृत मुलांची सुटका केली असून, ३०० हून अधिक संशयित अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
मानवी तस्करी करणारे एक रॅकेट कार्यरत असून, ते लहान मुलांना आपले लक्ष्य करीत होते. चीनच्या युन्नन आणि सिचुआन प्रांतातून मुलांचे अपहरण करून त्यांची अन्य प्रांतात विक्री केली जात असे, असे सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. जवळपास ११ प्रांतातील पोलिसांनी त्यानंतर संयुक्तपणे कारवाई करून दोन महिलांसह ९२ मुलांची सुटका केली आणि ३०१ अपहरणकर्त्यांना अटक केली.