चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी भारतीय पंतप्रधानांना आपल्या देशात येण्याचे आमंत्रण दिले आहे. भारतात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने चीनकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांना आपल्या देशात येण्यासाठी आमंत्रण देणारे ली केकियांग हे पहिलेच आंतराष्ट्रीय नेते आहेत. यापूर्वी ली केकियांग यांनी पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींना फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या. नरेंद्र मोदींनीसुद्धा चीनच्या पंतप्रधानांचे आभार मानताना आंतरराष्ठ्रीय धोरणे ठरवताना चीनला नेहमीच प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. तसेच भारत आणि चीनमधील सुसंवाद अधिक वाढवून या दोन्ही देशांतील व्यापारी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत झाले होते.