News Flash

युद्धासाठी तयार रहा, चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे सैन्याला आदेश

चीनशी निष्ठा राखण्याचं सैन्याला केलं आवाहन...

दोन्ही देशांच्या एअर फोर्स टू एअर फोर्स सहकार्यामध्ये सुद्धा हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सहकार्य आणि देवाण-घेवाण प्रक्रियेमध्ये उच्च क्षमतेचे उपग्रह फोटो, टेलिफोन इंटरसेप्ट तसेच चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर सैन्याची आणि शस्त्रास्त्रांची तैनाती कुठेय, याची अचूक माहिती मिळेल.

पूर्व लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आहे. दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावाची स्थिती आहे. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांना युद्धासाठी सज्ज रहाण्याचे आदेश दिले आहेत. देशाशी पूर्णपणे निष्ठावान रहा, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. शिन्हुआ या चिनी वृत्त संस्थेच्या हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिले आहे.

जिनपिंग यांनी मंगळवारी गुआंगडोंग या चीनच्या लष्करी तळाला भेट दिली. प्रचंड सर्तक रहा आणि युद्धाच्या तयारीवर ऊर्जा केंद्रीत करा असे जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला आवाहन केले. भारत, अमेरिका कि, अन्य कुठल्या देशासंदर्भात जिनपिंग यांनी हे वक्तव्य केले, ते अजून स्पष्ट झालेले नाही.

कारण भारत, अमेरिका आणि दक्षिण चीन सागरातील अन्य देशांबरोबर चीनचा वाद सुरु आहे. चीनच्या भारताला लागून असलेल्या सीमेवर तर प्रचंड तणावाची स्थिती आहे. जून महिन्यात गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा अधिक सैनिक ठार झाले. त्यानंतर पँगाँग टीएसओ सरोवर परिसरात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. चीनची कुठलीही दादागिरी सहन न करता, भारतानेही प्रत्येकवेळी चीनला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. दक्षिण चीन सागरात अमेरिकेबरोबरही त्यांचा वाद सुरु आहे.

पँगाँग तलावात भारताने पाण्याखालून चाल करु नये, म्हणून चीन….
पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरु झाल्यापासून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पँगाँग टीएसओच्या परिसरावर हायस्पीड गस्ती नौकांद्वारे लक्ष ठेवून आहे. चीनकडून टाइप ३०५ आणि टाइप ९२८ डी बोटींचा वापर करण्यात येतो. या नौका स्वीडीश सीबी-९० ची कॉपी आहे.

चीन पँगाँग टीएसओ परिसरातील फक्त भूभागावरच नव्हे, तर पाण्याखालून कुठली हालचाल होऊ नये, यावरही चीन लक्ष ठेवून आहे. भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो, ही भीती चीनच्या मनात आहे. जगभरातील नौदलं ज्या पाणबुडी विरोधी तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्याचाच वापर चीनकडून सरु आहे. ताज्या उपग्रह छायाचित्रांवरुन हा खुलासा झाला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 6:48 pm

Web Title: chinese president xi jinping asks troops to prepare for war be absolutely loyal dmp 82
Next Stories
1 समलिंगी विवाह; सनातन धर्माच्या पाच हजार वर्षांत ही वेळ आली नव्हती – कोर्टात सरकारचा युक्तिवाद
2 ‘भाजपाला कोणाच्याही जीवाची किंमत नाही’; काँग्रेसचा #NoLivesMatterToBJP मधून हल्लाबोल
3 गुजरात : ‘तनिष्क’च्या शोरूमवरील हल्ल्यासंदर्भातील वृत्तावर पोलिसांचे स्पष्टीकरण, म्हणाले…
Just Now!
X